
फोटो सौजन्य AI
अल जझीराने सार्वजनिक खरेदीच्या नोंदी , कंपन्यांचे अहवाल आणि कॉर्पोरेट खुलासांचा अभ्यास केला . त्यानुसार संबंधित १७ कंपन्या आणि संस्थांकडे एकूण १२५ सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटे आहेत . या सर्व कंत्राटांची एकत्रित किंमत २.१२९ अब्ज पौंड असल्याचे सार्वजनिक खरेदी विश्लेषण करणाऱ्या Tussell च्या आकडेवारीनुसार समोर आले आहे .
या कंत्राटांमध्ये ब्रिटनच्या सार्वजनिक सेवांसाठी आवश्यक असलेल्या विविध कामांचा समावेश आहे . त्यामुळे इस्रायली वस्त्यांशी संबंधित कंपन्यांना ब्रिटनच्या सार्वजनिक पैशातून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मिळत असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे .
या कंत्राटामधील सर्वात मोठा हिस्सा अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी Motorola Solution शी संबंधित कंपन्यांचा असल्याचे तपासणीत म्हंटले आहे . या समूहाशी संबंधित कंपन्यांकडे १.७ अब्ज पौंडा पेक्षा अधिक मूल्याची कंत्राटे असल्याचे समोर आले आहे . यातील मोठा भाग ब्रिटिश उपकंपनी Airwave Solution शी संबंधित आहे .
याशिवाय Heidelberg Materials, Egis, CAF आणि Fosun या कॉर्पोरेट समूहांशी संबंधित कंपन्यांचाही या कंत्राटांमध्ये सॅम,समावेश असल्याचे अहवालात या पाच कॉर्पोरेट समूहांचा इस्रायली वस्त्यांशी संबंधित व्यावसायिक गतिविधींमध्ये सहभाग असल्याचे नमूद आहे .
या तपासणीचा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा ब्रिटनमध्ये इस्रायली वस्त्यांशी व्यापारावर निर्बंध घालण्याची मागणी जोर धरत आहे. १४० हून अधिक Labour खासदारांनी इस्रायली वस्त्यांशी व्यापारावर बंदी घालण्याचे आवाहन केल्याचे अल जझीराने म्हटले आहे. दरम्यान, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री एड मिलिबँड यांनी वेस्ट बँकमधील इस्रायली वस्ती विस्ताराला विरोध करत आगामी काळात व्यापक उपाययोजना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारवर सार्वजनिक पैशांचा वापर कोणत्या कंपन्यांसोबत केला जातो, याची अधिक कठोर छाननी करण्याचा दबाव वाढू शकतो. मात्र संबंधित कंपन्यांचे कंत्राटे आणि त्यांच्या इस्रायली वस्त्यांशी असलेल्या व्यावसायिक संबंधांचे स्वरूप वेगवेगळे असल्याने प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार करणे आवश्यक ठरणार आहे.