Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटनची रशियाविरोधात मोठी कारवाई; ‘या’ तेल कपंन्यांवर लादले निर्बंध, भारतावर होणार परिणाम?

ब्रिटनने रशियाच्या तेल आणि कच्च्या तेलाच्या व्यापारावर नवे निर्बंध लादले आहेत. याचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. यामध्ये एका भारतीय कंपनीचाही समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2025 | 01:52 PM
UK Sanction's on Russian oil Companies

UK Sanction's on Russian oil Companies

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिटनचे रशियाच्या तेल कंपन्यांवर नवे निर्बंध लागू
  • भारताचा एका कंपनीचाही समावेश
  • भारतावर होणार थेट परिणाम?
UK’s Sanction on Russia’s Oil Comapnies : लंडन : एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनने (Britain) सरकारने रशियाविरोधात (Russia) एक मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटनने रशियन तेल कंपन्यांवर ९० नवे निर्बंध लादले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका भारतीय पेट्रोलियम कंपनीचाही समावेश आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

ब्रिटनने रशियाच्या लुकोइल आणि रोझनेफ्टवर निर्बंध लादले आहेत. तर भारताची पेट्रोलियम नारा एनर्जी लिमिटेडवरही निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटनने म्हटले आहे की, नायरा एनर्जी लिटमिटेडने २०२४ मध्ये रशियाकडून अब्जावधी डॉलर्सचे कच्चे तेल खरेदी केली होते. यामुळे त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी…

युक्रेन युद्धबंदीसाठी घेतला निर्णय

ब्रिटनच्या मते, रशियाच्या युद्धासाठी निधीच्या स्त्रोतांवर हल्ल केल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) युद्धबंदीस भाग पडतील. रशियाला मिळणार तेल महसूल रोखणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यलय (FCDO) ने दावा केला आहे की, यामुळे रशियाला तेल बाजारातून बाहेर काढण्यास मदत होईल आणि युक्रेनविरुद्ध रशियाला मिळणारा महसूलही रोखला जाईल.

युरोपियन युनियननेही लादले रशियावर निर्बंध

यापूर्वी युरोपियन युनियनने देखील रशियावर निर्बंध लादले होते. यामध्ये नायरा एनर्जी लिमिटेडचा समावेश होता. यावेळी युरोपियन युनियनच्या या निर्बंधांना तीव्र विरोधही करण्यात आला होता. कंपनीने म्हटले होते की, भारतीय कंपनी नायरा आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पूर् पालन करते. कंपनी केवळ देशाच्या उर्जा सुरक्षा आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करते.

भारतावर होणार परिणाम?

ब्रिटनच्या या नव्या निर्बंधामुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय पेट्रोलियम कंपीन नायरा एनर्जी लिमिटेडवर निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे भारताच्या उर्जा क्षेत्रावर याचा परिणाम होऊ शकतो. रशिया हा भारतासाठी स्वस्त दरात कच्चा तेल पुरवणार देश आहे. पण या निर्बंधामुळे यामध्ये अडथळा येऊ शकतोत यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवर मर्याद येतील.

तसेच परकीय गुंतवणूकीवरही परिणाम होण्याची शक्यात आहे. भारताची उर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. पण या निर्बंधामुळे भारताला रशियाला पर्यायी स्रोत शोधावे लागतील. यामुळे अप्रत्यक्षपणे भारतातील इंधन दरांवर परिणाम होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. ब्रिटनने रशियाच्या कोणत्या तेल कपंन्यांवर लादले निर्बंध?

ब्रिटनने रशियाच्या लुकोइल आणि रोझनेफ्टवर या कच्च्या तेलाच्या किंमतींवर निर्बंध लादले आहे.

प्रश्न २. ब्रिटनच्या रशियावरील निर्बंधामध्ये कोणत्या भारतीय कंपनीचा समावेश आहे?

भारताची पेट्रोलियम नारा एनर्जी लिमिटेडवरही ब्रिटनने रशियाकडून अब्जावधी तेल खरेदीमुळे निर्बंध लागू केले आहेत.

प्रश्न ३. ब्रिनटनाचा रशियावरील निर्बंधाचा हेतू काय आहे?

ब्रिटनच्या रशियाच्या तेल कंपनींवरील नव्या निर्बंधामुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मिळणार महसूल रोखणे आहे.

Pak-Afghan War : पाकिस्तानी सैन्य पॅन्ट सोडून गेले पळून ; अफगाणी सैन्यानी भरचौकात केला जल्लोष

Web Title: Uk sanctions on russian oil companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • britain
  • Russia
  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!
1

World War 3 : तिसरं महायुद्ध अटळ? नॉर्वेने नागरिकांना पाठवला जप्तीचा आदेश; पोलंडमध्येही सर्वाइव्हल बुक, युरोपमध्ये घबराट!

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप
2

भारताची Diplomatic Strike! 22 शक्तिशाली अरब देश एकाच वेळी दिल्लीत, चीन-पाकिस्तानची उडाली झोप

Why Greenland is important: बर्फाने झाकला तरीही जमिनीखाली अरबोंचा खजिना; ग्रीनलँडवर अमेरिकेची का आहे वाकडी नजर?
3

Why Greenland is important: बर्फाने झाकला तरीही जमिनीखाली अरबोंचा खजिना; ग्रीनलँडवर अमेरिकेची का आहे वाकडी नजर?

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल
4

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.