Pak-Afghan War : पाकिस्तानी सैन्य पॅन्ट सोडून गेले पळून ; अफगाणी सैन्यानी भरचौकात केला जल्लोष (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pak-Afghan War news marathi : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू झाली आहे. बुधवारी(१५ ऑक्टोबर) दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते. याचा दोन्ही देशांच्या शेकडो नागरिकांवर विशेष करुन महिला आणि मुलांवर परिणाम झाला आहे.
तालिबानने पाकिस्तान हवाई हल्ले सुरु केल्याने प्रत्युत्तरदाखल कारवाई केल्याचा दावा केला, तर पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानने (Afghanistan) त्यांच्या सीमांवर प्रथम हल्ला केल्याचा आरोप केला. परंतु सध्या दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दिली आहे. याच वेळी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने दावा केला आहे की, पाकिस्तानच्या सैनिकांनी भीतीने ड्युरंड रेषेवरुन धूम ठोकली. एवढेच नव्हे तर त्यांना पॅन्टही सोडल्या.
दावा केला जात आहे की, पाकिस्तानी सैन्याने ड्युरंड रेषेजवळील त्यांच्या चौक्या सोडून पळून गेले आहे. यावेळी तालिबानी सैनिकांनी त्यांची शस्त्रे लुटली. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टीही घेतल्या आणि भर चौकात एका खांबाला लटकवल्या. तालिबानी सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवल्याचा दावा करत जल्लोष साजरा केला. याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘Empty trousers’, recovered from abandoned military posts of Pakistani army near Durand Line displayed in eastern Nangrahar province, Afghanistan. pic.twitter.com/MvjAOsdCgC — Daud Junbish 🇦🇫 (@DaudJunbish) October 14, 2025
अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ले केला होता. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. यामुळे एकेकाळी इस्लामिक बंधु मानले जाणाऱ्या देशात वाद उभारला. २०२१ मध्ये अफगाणिस्तान मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर हा वाद आणखी पेटला आणि पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान (TTP) लक्ष्य करण्यास सुरु केली.
यामुळे दोन्ही देशांत वाद सुरु झाला. TTP हा अफगाणिस्तानचा जवळचा मानला जातो. शिवाय दोन्ही देशांत दीर्घकाळापासून ड्युरंड सीमारेषेवरुनही वाद आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप करतात.
प्रश्न १. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कधीपासून सुरु झाला संघर्ष?
२०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये वाद सुरु झाला.
प्रश्न २. अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने कसा जल्लोष साजरा केला?
पाकिस्तानी सैन्याने ड्युरंड रेषेजवळील त्यांच्या चौक्या सोडून पळून गेले. यावेळी तालिबानी सैन्याने त्यांची शस्त्रे लुटली. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टीही घेतल्या आणि भर चौकात एका खांबाला लटकवल्या आणि आनंद साजरा केला.
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी…