Ukraine and US soon to signing mineral deal
कीव: युक्रेन आणि अमेरिकेत दुर्मिळ खनिजांचा व्यवहार निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या करारानुसार, युक्रेन अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात दुर्मिळ खनिजांचा पुरवठा करणार आहे. या कराराची दोन्ही देशांनी अधिकृत घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याकडे काही दिवासांपूर्वी दुर्मिळ खनिजांची मागणी केली होती आणि मागणी मान्य नसल्यास अमेरिककडून मिळणारी मदत बंद केली जाईल अशी धमकी दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प चा युक्रेनवर दबाव
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनवर दबाव टाकत होते. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर युक्रेनने ही खनिजे दिली नहीत तर त्यांना स्टारलिंक सेवा उपलब्ध करुन दिली जाणार नाही. पूर्वी झेलेन्स्की यांनी अमेरिकेला 500 अब्ज डॉलर्सच्या खनिजांचा स्वस्तात पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर युक्रेनने या वचनाचे पालन केले नाही. तसेच ट्रम्प यांनी युक्रेनला सुरक्षा हमी देण्यासही नकार दिला होता.
अमेरिका फुकट मदत करत नाही
अमेरिका कधीही कोणालाही विनामूल्य मदत करत नाही. गेल्या तीन वर्षांत अमेरिका यूक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवत होती, ती विनामूल्य नव्हती. अमेरिकेची खरी नजर यूक्रेनच्या खनिज संपत्तीवर होती.
दुर्मिळ खनिजांचा महत्त्वाचा उपयोग
युक्रेनमध्ये मिळणारी दुर्मिळ खनिजे शस्त्रे आणि लष्करी उपकरणांच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. सध्या युक्रेनकडे जगातील खनिजसाठ्यापैकी एकूण 5% साठी उपलब्ध आहे. विशेषथ: 19 दशलक्ष टन ग्रेफाइच आणि युरोपच्या एकणून लिथियम साठ्यांपैकी 33% साठा युक्रेनमध्ये. रशिया युद्ध सुरु होण्यापूर्वी टायटॅनियम उत्पादनात युक्रेनकडे 7% हिस्सा होता.
निम्मा भाग रशियाच्या ताब्यात
सध्या युक्रेनच्या अनेक क्षेत्रांवर रशियाचा ताबा आहे. यामध्ये लुहांस्क, डोनेत्स्क, झापोरिझ्झिया आणि खेर्सॉन या प्रदेशांचा समावेश असून या ठिकाणी युक्रेनच्या एकूण खनिज साठ्यापैकी 53% हिस्सा आहे. या प्रदेशांमध्ये सुमारे 6 ट्रिलियन पौंड (660 लाख कोटी रुपये) किमतीचे खनिज आहे.
युक्रेन अमेरिका कराराचे परिणाम
सध्या युक्रेनच्या अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवण्याच्या करारा अंतर्गत ट्रम्प त्यांना पुनर्विकासासाठी आर्थिक मदत करेल. मात्र, युक्रेनला सुरक्षेची हमी मिळालेली नाही. सध्या अमेरिका जागतिक खनिज पुरवठ्यात स्वत:ची भूमिका वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र, अमेरिका या भागांवर कब्जा केल्यास, त्याला रशियन सैन्याला तेथून हटवावे लागेल यामुळे अमेरिका आणि रशियात संघर्ष निर्माण होऊ शकतो.