Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine War : एअर रेड अलर्ट सुरू असतानाच महिलेची प्रसूती; युद्धाच्या छायेत जन्माला आले बाळ

Ukraine War : किव्हमधील मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये एअर रेड अलर्ट सुरू असतानाच ॲलोना बोहातिरेन्को यांनी मुलीला जन्म दिला. रशियन ड्रोन हल्ल्यांचा धोका असतानाही डॉक्टरांनी प्रसूती पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. युद्धामुळे युक्रेनमधील गर्भवती महिला आणि कुटुंबांना सुरक्षिततेच्या गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 06:43 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • एअर रेड अलर्टमध्येच बाळाला जन्म दिला
  • युद्धाच्या छायेत मातृत्वाचा संघर्ष
  • युद्ध थांबण्याची प्रतीक्षा; मातृत्व मात्र सुरूच
Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. अशाच परिस्थितीत किव्हमधील एका रुग्णालयात ॲलोना बोहातिरेन्को यांनी हवाई हल्ल्याचा इशारा सुरू असतानाच आपल्या बाळाला जन्म दिला. प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात किव्हमध्ये एअर रेड अलर्ट सुरू झाला होता. मात्र, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत प्रसूती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर एका मुलीचा जन्म झाला आणि युद्धाच्या सावटात एका कुटुंबासाठी आनंदाचा क्षण निर्माण झाला.

एअर रेड अलर्टमध्येच बाळाला जन्म दिला

किव्ह सिटी मॅटर्निटी हॉस्पिटल क्रमांक २ मध्ये बोहातिरेन्को यांची प्रसूती सुरू होती. त्याचवेळी शहरात हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला. रशियन ड्रोन हल्ल्यांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मात्र बोहातिरेन्को यांची प्रसूती अंतिम टप्प्यात असल्याने परिस्थिती अत्यंत संवेदनशील होती. अखेर डॉक्टरांनी रुग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. बाळाचा जन्म झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना बोहातिरेन्को यांनी मी एअर अलर्ट सुरू असतानाच बाळाला जन्म दिला . असे सांगितले.युद्धाच्या परिस्थितीतही आई आणि बाळ सुरक्षित राहिल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Germany Politics : AfDचा झंझावाती उदय; जर्मनीनंतर आता संपूर्ण युरोपच्या राजकारणाला हादरा

युद्धाच्या छायेत मातृत्वाचा संघर्ष

बोहातिरेन्को या अशा अनेक महिलांपैकी एक आहेत, ज्यांना युक्रेनमध्ये युद्धाच्या धोक्यात प्रसूतीला सामोरे जावे लागत आहे. किव्हमध्ये अलीकडच्या काळात रशियन ड्रोन हल्ल्यांचा धोका वाढला असून दिवसा आणि रात्रीही एअर रेड अलर्ट देण्यात येत आहेत.

रुग्णालयातील गर्भवती महिलांना गरज भासल्यास सुरक्षित आश्रयस्थळी हलवले जाते. मात्र प्रसूतीसारख्या परिस्थितीत प्रत्येक वेळी तातडीने स्थलांतर करणे शक्य नसते. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णाच्या स्थितीचा आणि बाहेरील हल्ल्याच्या धोक्याचा एकाच वेळी विचार करावा लागत आहे.

युद्धामुळे युक्रेनमध्ये जन्मदरावरही परिणाम झाला आहे. सुरक्षेची चिंता, आर्थिक संकट आणि अनेक पुरुषांचे सैन्यात असणे यामुळे अनेक कुटुंबे मुलांच्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत.

Gaza Tragedy : शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकलीचा मृत्यू; वफा आणि वडील इस्रायली हल्ल्यात ठार

युद्ध थांबण्याची प्रतीक्षा; मातृत्व मात्र सुरूच

रशिया-युक्रेन युद्धाने युक्रेनमधील आरोग्य व्यवस्थेसमोरही मोठे आव्हान उभे केले आहे. रुग्णालये, डॉक्टर आणि रुग्णांना सततच्या हवाई हल्ल्यांच्या सावटाखाली काम करावे लागत आहे.

तरीही युद्धाच्या भीषण परिस्थितीत नव्या जीवाचा जन्म आशेचा संदेश देत आहे. बाहेर सायरन वाजत असताना रुग्णालयाच्या आत नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येणे, ही युक्रेनमधील युद्धाची मानवी किंमत आणि त्याचवेळी जीवनाच्या जिद्दीचे प्रतीक ठरत आहे.

 

 

 

Web Title: Ukraine war woman gives birth amidst air raid alert baby born under the shadow of war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • air attack
  • Russia
  • ukrain russia war
  • Ukraine War

संबंधित बातम्या

Vladimir Putin : ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे पुतिन नमले? कीववर 3 दिवस डागणार नाहीत क्षेपणास्त्रे; क्रेमलिनचा मोठा खुलासा
1

Vladimir Putin : ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे पुतिन नमले? कीववर 3 दिवस डागणार नाहीत क्षेपणास्त्रे; क्रेमलिनचा मोठा खुलासा

Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर
2

Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
3

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
4

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.