Ukrainian President Zelensky to visit India soon
Ukriane’s Zelensky soon to Visit Iindia : कीव/मॉस्को : युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांनी यांची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. यासाठी चर्चा सुरु आहे. पण लवकरच ते भारताला भेट देतील असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी युक्रेनला भेट दिली होती. यावेळी त्यांनी झेलेन्स्कींना भारत भेटीचे आमंत्रण दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हा यांचा पहिलाच भारत दौरा असेल.
भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर
याच वेळी भारत आणि युक्रेनच्या संबंधाचे एक विशेष दृश्य देखील भारतात पाहायला मिळाले. युक्रेनच्या स्वतंत्र्य दिना दिवशी दिल्लीतील कुतूब मीनारवर युक्रेनचा झेंडा फडकताना दिसला. यावेळी ओलेक्झांडर यांनी सांगितले, भारत आणि युक्रेनच्या भविष्यातील धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वत: झेलेन्स्कींना आमंत्रण दिले आहे. सध्या दोन्ही देश यावर काम करत आहे. आम्हाला आशा आहे लवकरच अध्यक्ष झेलेन्स्की नक्कीच भारतात येतील. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधामध्ये एक मोठी. सध्या तारीख निश्चित करणाऱ्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू आहे.
#WATCH | Delhi | Ambassador of Ukraine to India Oleksandr Polishchuk said, “… In relation to the declaration about the future strategic partnership between India and Ukraine, believe me, we have potential for that. The Indian Prime Minister invited Zelensky to come to India.… pic.twitter.com/7DdZpCW57A
— ANI (@ANI) August 23, 2025
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट दिली होती. भारतीय पंतप्रधानांचा हा युक्रेला पहिलाच दौरा होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली होती. येते त्यांनी रशिया युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धावर (Russia Ukriane war) भारताचीही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, भारत नेहमीच शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावर आणि तोडगा काढवण्यावर विश्वास ठेवतो. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांशी भारताचे संबंध चांगले आहे. यामुळे भारताने आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे.
शिवाय याच वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांचाही भारत दौरा होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस पुतिन भारताला भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढत आहे.