United Airlines Boeing Plane Declares Mayday After Takeoff, Causes Panic Among Passengers
United Airlines mayday call : वॉशिंग्टन : अमेरिकेत युनायटेड एअरलाईन्सच्या बोईंग विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. बोईंग विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच MAYDAY चा सिग्नल एअर ट्राफिक कंट्रोलला मिळाला. यानंतर एअर ट्राफिक कंट्रोलने परिस्थिती सुरक्षितपणे हाताळती आणि विमानाचे लॅंडिग केले. हे बोईंगचे ७८७-८ ड्रीमलाईनर विमान होते. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, युनाटेड एअरलाइन्सच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइन विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. यावेळी विमान ५००० फूट उंचीवर होते. तांत्रिक बिघाडाचे कळताच वैमानिकाने तातडीने MAYDAY चा मेसेज एअर ट्राफिक कंट्रोलला पाठवला. यानंतर लगेचच एअर ट्राफिक कंट्रोलने परिस्थिती हाताळत विमान सुरक्षितपणे उतरवले.
या घटनेने लोकांना १२ जून रोजी गुजरातच्या अहमदाबाद येथे घडलेल्या अपघाताची आठवण करुन दिली. गुजरातमध्ये या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या भयावह दुर्घटनेने देशात शोकाकुळ पसरला होता. यामध्ये २७० जणांचा बळी गेला होता. हे विमान देखील बोईंगचे ७८७-७ ड्रीमलाइनर होते यामुळे युनाटेड एअरलाइन्सच्या बोईंग विमानाच्या वैमानिकाने MAYDAY चा मेसेज दिल्यावर मोठा गोंधळ उडाला होता.
युनायडेट एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान जवळपास २ तास ३८ मिनिटे हवेतच होते. विमानाला उतरवण्यासाठी इंधन रिकामे करण्याची गरज होती. यावेळी विमान वॉशिंग्टनच्या वायव्यडे फिरकत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एअर ट्राफीक कंट्रोलने फ्लाइट सुरक्षितपणे उतरवली आहे. सध्या तांत्रिक बिघाडाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
यापूर्वी शनिवारी (२७ जुलै) अमेरिकेन एअरलाइन्सच्या बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानाचे लॅंडिग गियर फेल झाले होते. मात्र वेळेत बिघाडाची माहिती मिळाल्याने सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये १७३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. बोईंग विमानाच्या बिघाडाच्या सततच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.