अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा जागतिक स्तरावर परिणाम; मात्र 'या' देशांनी झाला मोठा फायदा, भारताचे नाव यादीत आहे का?
नवी दिल्ली: अमेरिकेच्या तैवानच्या पाठिंब्यामुळे चीनसोबत तणाव वाढत चालला आहे. दरम्यान अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापर युद्धात देखील तणाव वाढला आहे. याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून आला असून काही देशांना मात्र या संधीचा फायदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह ( GTRI ) ने याबबात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दक्षिण-पूर्व अशियाई देश आणि भारताला देखील फायदा झाला आहे.
या देशांना झाला अमेरिका-चीन व्यापार संघर्षाचा फायदा
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या (GTRI) अहवालानुसार, दक्षिण-पूर्व आशियाई देश मेक्सिको, कॅनडा आणि ASEAN यांना या संघर्षाचा फायदा झाला आहे. यामध्ये भारताला देखील मोठा फायदा झाला आहे.
भारताला व्यावसायिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता
अद्याप आपल्या व्यावसायिक धोराणांमध्ये सुधारणा होणे गरजेते असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, अमेरिका आणि चीन व्यापार संघर्षात भारतालाही निर्यातीमध्ये 36.8 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे. यामध्ये, स्मार्टफोन, फार्मास्युटिकल्स, इंजिनिअरिंग वस्तू अशा क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. मात्र, या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर असून मेक्सिको, कॅनडा, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया आणि जर्मनी हे देश भारतापेक्षा अधिक लाभ घेण्यात यशस्वी ठरले आहेत.
या घटाकांमुळे भारताला फायदा
भारताच्या निर्यात वाढीतील मुख्य घटक म्हणजे स्मार्टफोन, दूरसंचार उपकरणे यामधील 6.2 अब्ज डॉलरची वाढ तर फार्मास्युटिकल्समध्ये 4.5 अब्ज डॉलर पेट्रोलियम तेलामुळे 2.5 अब्ज डॉलर, तर सोलर पॅनल्समुळे 1.9 अब्ज डॉलर वाढ झाली. या सगळ्यांमध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
GTRI च्या अहवालानुसार, भारताला निर्यातीत स्थानिक मूल्यवृद्धी वाढवावी लागेल, म्हणजे भारताला जस्तीत जास्त वस्तूंच्या निर्यांतींवर आणि त्यांच्या किंमतींवर लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या भारत अनेक उत्पादनांमध्ये चीनवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, स्मार्टफोनसाठी अनेक भाग चीनमधून आयात होतात, सोलर पॅनलसाठी सोलर सेल्स चीनमधून येतात, तर औषधांच्या APIs पैकी 70 टक्के आयात चीनवर अवलंबून आहे.
ट्रम्प कार्यकाळात भारतासाठी अनेक संधी
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर भारतासाठी व्यापारात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आपल्याला अनेक गोष्टींचा लाक्ष होईल. GTRI च्या मते, ट्रम्प यांचा कार्यकाळ अमेरिका-भारत संबंधात सकारात्मक बदल घडवून भारत आपल्या निर्यात धोरणांद्वारे अधिक फायदा घेऊ शकतो.
यासाठी भारताने आयात शुल्कात बदल करून सरासरी शुल्क 10 टक्क्यांपर्यंत आणावे, जेणेकरून निर्यात वाढीस चालना मिळेल आणि देशाच्या महसुलावर फारसा परिणाम होणार नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे.