
US drops 'Indo' from Pacific Command name
G7 Summit मध्ये भारताचा दबदबा; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून PM मोदींचे खास स्वागत, पहा PHOTOS
इंडो-पॅसिफिक कमांड ही संकल्पना भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या क्वाड गटाशी संबंधित आहे. हा क्वाड गट चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर या दोन्ही क्षेत्रांच्या एकत्रित महत्त्व या नावामुळे मिळत होते. मात्र, यात बदल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी यूएस पॅसिफिक कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक केले होते. भारताचे वाढते सामरिक महत्त्व आणि हिंद महासागरातील भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका सध्या प्रशांत महासागर, तैवान, जपान आणि फिलिपिन्स भागांकडे वळत आहे. भारताला आता धोरणात्मक महत्त्व कमी अमेरिकेच्या नजरेत कमी झाल्याचे दिसत आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याशिवाय अमेरिका चीनला रोखण्यासाठी आता भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, ही भारतासाठी चांगली संधी आहे. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करुन स्वत:ची आर्थिक आणि सामरिक ताकद मजबूत करण्याची संधी आहे. परंतु या निर्णायाचा क्वाड संबंधावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. भारत क्वाड मधून बाहेर पडेल का असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य ट्रम्प-मोदी यांच्या भेटीकडे लागले आहे.
Department of War Restores U.S. Pacific Command Designation. CAMP H.M. SMITH, Hawaii — The Department of War announced today that the U.S. Indo-Pacific Command (USINDOPACOM) will officially restore its name to the U.S. Pacific Command (USPACOM). Originally established on… pic.twitter.com/ZL0EL3q6Ph — U.S. Pacific Command (@INDOPACOM) June 16, 2026