US-India Tariff War Donald Trump thinks India may slash tariffs but keeps April 2 reciprocal tax threat alive
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे जागतिक स्तरावर कॅनडा, मेक्सिको, चीन आणि भारतासोबत व्यापर युद्ध सुरु आहेडोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांवर लावलेल्या टॅरिफमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे. दरम्यान भारताचे अमेरिकेसोबत चांगले संबंध असूनही रेसिप्रोकल टॅक्स लावण्यात आला आहे. यामुळे भारत-अमेरिका व्यापर संबंधांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्सवर भारताबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांनी भारत हळूहळू अमेरिकी उत्पादनांवरील कर कमी करेल असे म्हटले आहे, मात्र 2 एप्रिलपासून भारतावरील रेसिप्रोकल टॅक्स योजनेवर अमेरिका अडून आहे.
एका इग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, पण भारत अमेरिकेवर जास्त कर लादतो. जगातील सर्वात जास्त शुल्क लादण्याऱ्या देशांमध्ये भारताचे नाव येते. ट्रम्प यांनी टॅरिफ किंग म्हणून भारतावर टीका केली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारत अमेरिकन उत्पादनांवर जास्त कर लादतो, यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यापार करणे कठीण होते. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारतात अनेक गोष्टी विकत घेणे कठीण आहे. मात्र ट्रम्प यांनी एकीकडे भारताकडून अमेरिकन उत्पादनांवरील कर कमी करण्याची आशा व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे भारतावरील रेसिप्रोकल टॅक्स अमेरिका लागून करणारच आहे असे त्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना म्हटले आहे की, अमेरिका 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅक्स लागू करेल, याचा उद्देश सांगताना त्यांनी म्हटले होते की, ‘जो देश आमच्यावर जेवढा टॅक्स लावेल तितकाच टॅक्स त्यांच्यावर लावण्यात येईल. यामध्ये त्यांनी भारत, चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांचा उल्लेख त्यांनी केला. ट्रम्प यांनी म्हटले की, हे देश अमेरिकेवर जास्त कर लागू करतात, यामुळे आम्ही देखील तितकाच कर लागू करु.
भारतीय आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयाचा काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: कृषी आणि वाहतूक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे GDP वाढीची शक्यता आहे, तसेच वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ शकतो, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, शेअर मार्केटमध्ये देखील अस्थिरता निर्माण होईल आणि गुंतवणूकगारांच्या चिंता वाढेल.या परिस्थितीत भारताने अमेरिकेसोबत व्यापार संबंध सुरळित करण्यासाठी काही महत्त्वाची पाऊले उचलायला सुरवात केली आहे.
रेसिप्रोकल टॅक्स(परस्पर कर) म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाच्या उत्पादनावर जेवढा कर लादला आहे, तेवढाच कर तो देशाही त्या देशाच्या उत्पादनांवर लादेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताला झटका! डोनाल्ड ट्रम्प एप्रिलपासून लागू करणार ‘हा’ मोठा निर्णय