
Greenlad Dispute
Greenland Dispute : अमेरिकन महासत्तेला डेन्मार्क देणार टक्कर? जाणून घ्या किती आहे सैन्य शक्ती?
अमेरिकेच्या संसदेत Greenland Annexation and Statehood Act विधेयक सादर केले असून यामुळे ट्रम्प यांना ग्रीनलँड हस्तक्षेप करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. रिपल्बिकन पक्षाचे खासदार रँडी फाइन यांनी हे विधेयक सादर केले आहे. त्याच्या मते, आर्क्टिक प्रदेशात चीन आणि रशियाचा प्रभाव वाढत आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेने ठोस पावले उचलणे महत्त्वाचे आहे. ग्रीनलँड हा भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असबन जागतिक सत्ता-संतुलनासाठी ते अमेरिकेत असे महत्त्वाचे आहे.
रँडी फाइन यांनी म्हटले की, ग्रीनलँडला अमेरिका भाग बनवणे हा केवळ भविष्याचा नाही, तर अमेरिकेच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. त्यांच्या मते अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेतले नाही, तर या भागात रशिया आणि चीनचा प्रभाव वाढले. हे अमेरिकेसाठी धोकादायक आहे. यामुळे हे विधेयक ट्रम्प प्रशासनाला ग्रीनलँडसाठी वाटाघाटी, करार आणि कायदेशीर चौकटीची ताकद देते.
यापूर्वी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु डेन्मार्कने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव नाकारला होता. ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील स्वायत्त राष्ट्र आहे. डेन्मार्कने म्हटले आहे की ग्रीनलँडबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा तेथील जनतेला आणि डेन्मार्कला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताब्याला डेन्मार्कने तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेने ग्रीनलँडवर कोणतीही कारवाई केल्यास ते स्वीकारले जाणार नाही असे डेन्मार्कने म्हटले आहे.
दरम्यान तज्ज्ञांच्या मते, ग्रीनलँड हा अफाट साधनसंपत्ती, खनिजे, तेल साठ्यांनी संपन्न आहे. तसेच येथून नव्या व्यापारी मार्गाचा विकास आणि लष्करी दृष्टीकोनातून याचे महत्त्व अधिक वाढत आहे. यामुळे जागितक पातळीवर याच्या नियंत्रणासाठी चीन, रशिया आणि अमेरिकेत तणावा निर्माण झाला आहे.
Greenland वाद पेटला! ट्रम्पच्या धमक्यांनंतर डेन्मार्कची भारताकडे मदतीची हाक
Ans: हे विधेयक अमेरिकेने संसदेत सादर केले असून यामध्ये ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवण्यासाटी, त्याला राज्याचा दर्जा देण्यासाठी कायदेशीर प्रस्ताव आहे.
Ans: अमेरिकेच्या मते आर्क्टिक प्रदेशात चीन आणि रशियाचा प्रभाव वाढत असून हे अमेरिकेसाठी धोकादायक आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतूने ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहे.
Ans: तज्ज्ञांच्या मते, अमेरिका ग्रीनलँड केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतूनचे नाही तर, येथील फाट साधनसंपत्ती, खनिजे, तेल साठ्यांसाठी प्रयत्न करत आहे. तसेच येथून तयार होणार व्यापारी मार्ग आणि लष्करीच्या दृष्टीकोनातून अमेरिकेसाठी महत्त्व वाढत आहे. यामुळेच अमेरिका ग्रीनलँवडवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
Ans: अमेरिकेने ग्रीनलँडवर ताबा मिळवल्यास अमेरिका-रशिया-चीन या देशांमध्ये तमाव वाढू शकतो. तसेच डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचू शकतो. आर्क्टिक प्रदेशात सत्ता संघर्षही सुरु होईल.