Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत

US-Iran Peace Deal Update : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा होर्मुझबाबत मोठे संकेत दिले आहे. तसेच येत्या आठवड्याच्या अखरेसी इराणसोबत शांतता कराराची शक्यता वर्तवली आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या कराराकडे लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 09:49 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण युद्ध थांबणार?
  • ट्रम्प-यांच्याकडून होर्मुझबाबतही मोठे विधान
  • या आठवड्याच्या शेवटी होणार करार
US-Iran Peace Deal News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराणमधील संघर्ष (US-Iran Conflict) काही थांबण्याचे नाव घेईना. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले होते. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांनी संघर्ष संपुष्टात येणार असल्याचा दावा केला आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीही पुन्हा सुरु होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जग हादरले! म्हणाले– ‘आज रात्री इराणवर होणार सर्वात मोठा हल्ला’

ट्रम्प यांच्या मते, येत्या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता कराराला अंतिम रुप देण्यात येईल. दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे कराराच्या मसुद्यावर सकारात्मक चर्चा सुरु आहे. या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांशी संवादा साधताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले की, हा करार केवळ अमेरिका-इराणसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दिलासादायक ठरेल.

होर्मुझबाबतही मोठे विधान

या करारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मध्ये होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यामुळे जगातिक व्यापार वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जाणार सागरी मार्ग होर्मुझ बंद केला हता. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा विस्कळीत होऊन मोठे इंधन संकट निर्माण झाले होते. ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांत करार झाल्यास इंधन दर पुन्हा सामान्य होतील. होर्मुझ मार्ग खुला होईल आणि जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु होईल असा दावा त्यांनी केला आहे.

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आक्रमक भूमिका

दरम्यान ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanhyahu) यांच्याशी चर्चा केली आहे. इस्रायलच्या सुरक्षेचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमांवर निर्बंध, क्षेपणास्त्र उत्पादनावर नियंत्रण आणि प्रादेशिक गचटांना मिळणाऱ्या मदतीवर बंदी घालण्याच्या अटी करारत असतील. इराणला कोणत्याही प्रकारचे धोकादायक शस्त्र बाळगू दिले जाणार हे त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या नौदल-लष्कर ताकदीबाबतही मोठा दावा

याशिवाय ट्रम्प यांनी इराणची नौदल आणि लष्करी ताकद पूर्णपणे निकामी झाल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, इराण (Iran) आता कोणतेही प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाही. यामुळे इराणविरोधी कारवाया स्थगित केल्याचेही त्यांनी म्हटले. सध्या ट्रम्प यांच्या या विधानांनतर संपूर्ण जगाचे लक्ष शांतता करारकडे लागले आहे.

Middle East Crisis : पाकिस्तानच्या विनंतीवर नरमले ट्रम्प? इराणला वेळ दिल्याचा दावा, होर्मुझमधून कोटींचे तेल सुरक्षित बाहेर

Web Title: Us iran peace deal trump claims war may end soon hints on hormuz reopening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.