• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us President Donald Trump Will Soon Visit India

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी घडामोड; डोनाल्ड ट्रम्प लवकरच येणार भारत दौऱ्यावर; म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींसोबत…’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2025 | 07:24 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता लवकरच येणार भारत दौऱ्यावर; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींसोबत...'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता लवकरच येणार भारत दौऱ्यावर; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींसोबत...' (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वॉशिंग्टन : जागतिक पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध सुधारताना दिसत आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा खूप चांगली सुरू आहे आणि लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “आमच्यात चर्चा खूप चांगली सुरू आहे. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले आहे. मोदी माझे मित्र आहेत, आम्ही बोलत राहतो आणि त्यांनी मला भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्ही एक तारीख निश्चित करू… पंतप्रधान मोदी एक महान माणूस आहेत आणि मी भारताला भेट देईन.”

हेदेखील वाचा : Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत. ट्रम्प म्हणाले की, काही व्यापार मुद्द्यांवर मतभेद आहेत, परंतु त्यांची टीम त्यावर काम करत आहे.

भारत-अमेरिका व्यापार चर्चा सुरू

दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा गेल्या काही काळापासून सुरू असताना, अमेरिकेला भारताने आपली बाजारपेठा आणखी खुली करण्याचा विचार करावा असे वाटते, तर भारताला कृषी आणि तंत्रज्ञानात अमेरिकेकडून सवलती मिळण्याची आशा आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अनेक व्यापार करारांवरही चर्चा झाली होती, परंतु काही मतभेदांमुळे ते अपूर्ण राहिले.

भारत-रशिया तेल व्यापारावर ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी अलीकडेच भारत-रशिया तेल व्यापाराबाबत विधान केले. भारत आता रशियासोबत तेल व्यापार मर्यादित करेल. गेल्या महिन्यापासून ट्रम्प यांनी या मुद्द्यावर अनेक दावे केले आहेत. यापूर्वी, त्यांच्या भाषणात ट्रम्प यांनी भारतासोबत लवकर व्यापार करार करण्याचे संकेत दिले होते. भारत आणि अमेरिका लवकरच व्यापार करारावर स्वाक्षरी करतील.

मोदी-ट्रम्प यांच्यात चांगले संबंध

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात खूप काळापासून चांगले संबंध आहेत. ट्रम्प २०२० मध्ये भारताला भेट देऊन गेले होते, जिथे दोन्ही नेत्यांनी अहमदाबादमध्ये झालेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात एकमेकांचे कौतुक केले होते. आता, ट्रम्प यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा भारत-अमेरिका संबंधांबद्दल एक नवीन मुद्दा चर्चेला ठरला आहे.

Web Title: Us president donald trump will soon visit india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • narendra modi

संबंधित बातम्या

US Tariff Refund to India: भारत-अमेरिका व्यापारात मोठा ट्विस्ट! ट्रम्प सरकार दंडाचे पैसे परत करणार?
1

US Tariff Refund to India: भारत-अमेरिका व्यापारात मोठा ट्विस्ट! ट्रम्प सरकार दंडाचे पैसे परत करणार?

डोनाल्ड ट्रम्प यांना बधलं नाही चिनी सरकार! मीडिया टायकून जिमी लाई यांना ठोठावली 20 वर्षांची शिक्षा
2

डोनाल्ड ट्रम्प यांना बधलं नाही चिनी सरकार! मीडिया टायकून जिमी लाई यांना ठोठावली 20 वर्षांची शिक्षा

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट
3

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक
4

गाझाचा कायापालट होणार? वॉशिंग्टनमध्ये रंगणार ट्रम्प यांच्या ‘Board of Peace’ची पहिली बैठक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Feb 09, 2026 | 04:18 PM
Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला

Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला

Feb 09, 2026 | 04:17 PM
पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

Feb 09, 2026 | 04:12 PM
Kanpur Lamborghini Accident: 10 कोटींच्या लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडले, कोण आहे शिवम मिश्रा?

Kanpur Lamborghini Accident: 10 कोटींच्या लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडले, कोण आहे शिवम मिश्रा?

Feb 09, 2026 | 04:09 PM
Political News : प्रशासक की ‘सत्तेचा हस्तक’? नायगाव तालुक्यात लोकशाहीला ब्रेक

Political News : प्रशासक की ‘सत्तेचा हस्तक’? नायगाव तालुक्यात लोकशाहीला ब्रेक

Feb 09, 2026 | 03:58 PM
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

Feb 09, 2026 | 03:56 PM
IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

IND VS PAK :  “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

Feb 09, 2026 | 03:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.