Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल-ड्रोन हल्ल्यांची जो बायडेनने केली तीव्र शब्दांत निंदा म्हणाले…

Russia Ukraine War: जो बायडेन यांनी रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 26, 2024 | 12:14 PM
रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल-ड्रोन हल्ल्यांची जो बायडेनने केली तीव्र शब्दांत निंदा म्हणाले...

रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल-ड्रोन हल्ल्यांची जो बायडेनने केली तीव्र शब्दांत निंदा म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ समाप्तपूर्वी जो बायडेन प्रशानात अनेक मोठे निर्णय घेत आहेत. दरम्यान त्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. जो बायडेन यांनी रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. बायडेन यांनी म्हटले आहे की, रशिया उक्रेनच्या ऊर्जा यंत्रणेला लक्ष्य करून तेथील नागरिकांना थंडीत विजेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले आहे.

सैनिकी आणि शस्त्रास्त्र मदतीत लवकरच वाढ होणार

दरम्यान, बायडेन यांनी युक्रेनला सैनिकी मदत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेने मागील काही महिन्यांत युक्रेनला शेकडो मिसाइल्स पुरवले आहेत. याशिवाय ही मदत लवकरच अधिक वाढवली जाईल असे म्हटले जात आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाला शस्त्रसामग्रीची पुरवठा प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बायडेन यांनी इतर देशांनाही युक्रेनला मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, युक्रेनच्या नागरिकांना शांततेने आणि सुरक्षिततेने जगण्याचा हक्क आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात आता हिंदूंनंतर ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य; ख्रिसमसच्या दिवशी कट्टरपंथीयांनी जाळली 17 घरे

रशियाचा युक्रेनवरील हल्ला

रशियाने 78 मिसाइल्स आणि 106 ड्रोनच्या सहाय्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला केला. या हल्ल्यात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक हल्ले खारकीव शहरावर करण्यात आले. तसेच निप्रो, क्रेमेन्चुक, क्रिवी रिह आणि इव्हानो-फ्रँकिवस्क या ठिकाणांवरही हल्ले केले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा केंद्रे आणि निवासी भागांना लक्ष्य केले आहे. खारकीवचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शहरावर किमान 7 मिसाइल्स डागण्यात आल्या आहेत, ज्यामुळे 6 नागरिक जखमी झाले. हल्ल्यांनंतर युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

झेलेन्स्की यांचा पुतिनवर आरोप

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या या कृतीला ‘अमानवीय’ म्हटले आहे. त्यांनी पुतिन यांना ‘क्रूर व्यक्ती’ असे संबोधून आरोप केला आहे की, त्यांनी मुद्दाम ख्रिसमसच्या दिवशी हल्ला केला. युक्रेनच्या सर्वात मोठ्या ऊर्जा कंपनी DTEK ने सांगितले की, हा रशियाचा ऊर्जा प्रणालीवर 13वा मोठा हल्ला आहे. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, युक्रेन केलेल्या हल्ल्यामुळे, रशिया कठोर पावले उचलत आहे. याआधी, युक्रेनने रशियाच्या कझान शहरावर ड्रोन हल्ले केले होते. रशिया-युक्रेनमधील वाढते तणाव जगभरातील शांततेसाठी गंभीर समस्या ठरत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीन मोठ्या युद्धाच्या तयारीत? PLA साठी दिली ‘या’ 10 लाख आत्मघाती ड्रोनची मोठी ऑर्डर

Web Title: Us president slams russia over missile attacks on ukraine nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 12:14 PM

Topics:  

  • America
  • Joe Biden
  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ
1

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या
2

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
3

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता
4

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.