Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump: अमेरिकेची मोठी कारवाई! भारतीय वंशाच्या व्यक्तीसह २५ जणांचे नागरिकत्व होणार रद्द, यामागचं नेमकं कारण काय?

Donald Trump: अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय वंशाच्या एका व्यक्तीसह २५ नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळवलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खोटी माहिती, बनावट ओळख आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप लपवून नागरिकत्व मिळवल्याचा आरोप या व्यक्तींवर आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 03:11 PM
अमेरिकेची मोठी कारवाई! भारतीय वंशाच्या व्यक्तीसह २५ जणांचे नागरिकत्व होणार रद्द, यामागचं नेमकं कारण काय?

अमेरिकेची मोठी कारवाई! भारतीय वंशाच्या व्यक्तीसह २५ जणांचे नागरिकत्व होणार रद्द, यामागचं नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:
  • खोटी माहिती देऊन नागरिकत्व मिळवल्याचा आरोप
  • भारतीय वंशाच्या व्यक्तीसह २५ जणांवर अमेरिकेची कारवाई
  • अमेरिकेत नागरिकत्व रद्द करण्याची सर्वात मोठी मोहीम
 

Donald Trump: अमेरिकेच्या न्याय विभागाने (Department of Justice – DoJ) नैसर्गिकरित्या अमेरिकेचे नागरिकत्व मिळवलेल्या २५ व्यक्तींचे नागरिकत्व रद्द (Denaturalization) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या यादीत भारतीय वंशाचे ६५ वर्षीय नरिंदर सिंह यांचाही समावेश आहे. या सर्वांवर नागरिकत्व मिळवताना खोटी माहिती देणे, बनावट ओळख वापरणे किंवा गंभीर गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे.

भारतीय वंशाच्या व्यक्तीवर काय आरोप?

न्याय विभागाच्या माहितीनुसार, नरिंदर सिंह यांनी १९९६ पासून अमेरिकेत प्रवेश मिळवण्यासाठी दोन वेगवेगळ्या ओळखींचा वापर केला. त्यानंतर १ मे २००८ रोजी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. मात्र, नागरिकत्व अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आणि बेकायदेशीर कृत्ये लपवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सात गंभीर आरोप दाखल करण्यात आले असून, ते नागरिकत्वासाठी आवश्यक असलेल्या नैतिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

World News : PoK निवडणुकीनंतर नवाझ पुन्हा सत्तेत? पाकिस्तानात राजकीय खळबळ

१७ देशांतील २५ जणांवर कारवाई

अमेरिकेने ज्यांच्याविरुद्ध नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्या २५ व्यक्ती १७ वेगवेगळ्या देशांतील आहेत. यामध्ये भारताबरोबरच पाकिस्तान, मोल्दोव्हा, मेक्सिको, कोलंबिया, नायजेरिया, लायबेरिया, घाना, जमैका, तैवान, होंडुरास, कॅमेरून, जॉर्डन, क्युबा, एल साल्वाडोर, हैती आणि स्वीडन येथील नागरिकांचा समावेश आहे. पाकिस्तानी वंशाचे जिया मुराद भट्टी आणि मोहम्मद वासिफ यांच्याविरोधातही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ट्रम्प प्रशासनाची कठोर भूमिका

२० जानेवारी २०२५ नंतर अमेरिकेच्या न्याय विभागाने नागरिकत्व रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या १२३ वर पोहोचली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने फसवणूक करून किंवा माहिती लपवून नागरिकत्व मिळवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. कार्यवाहक अॅटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी सांगितले की, “अमेरिकेचे नागरिकत्व हा देशातील सर्वात मोठ्या विशेषाधिकारांपैकी एक आहे. ते केवळ कायदेशीर आणि प्रामाणिक मार्गानेच मिळवले गेले पाहिजे.”

गंभीर गुन्ह्यांचे आरोप

या २५ जणांविरोधातील तक्रारींमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये खोटी ओळख वापरणे, फसवणूक करून नागरिकत्व मिळवणे, हत्या करण्याचा प्रयत्न, बाल लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा, विवाहाच्या नावाखाली फसवणूक, पासपोर्ट आणि बँक फसवणूक, क्रेडिट कार्ड फसवणूक, परवान्याशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणे

अमेरिकेच्या न्याय विभागाने ही कारवाई नागरिकत्व रद्द करण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी समन्वित मोहीम असल्याचा दावा केला आहे. विभागाने स्पष्ट केले आहे की, नागरिकत्व प्रक्रियेची शुचिता राखण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील.

Breaking News : POK मध्ये पेटलं बंड; पाकिस्तानचं खरं रूप उघड !

Web Title: Us to revoke citizenship of 25 naturalized citizens indian origin man on list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Donald Trump
  • india
  • US

संबंधित बातम्या

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
1

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
2

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
3

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
4

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.