Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी

Black Tomahawk Cruise Missile : एक शक्यता अशी आहे की सध्या अमेरिकन नौदलासाठी तयार केल्या जाणाऱ्या टोमाहॉक जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांना काळ्या रंगात रंगवले जात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 12:59 PM
us uses mysterious black tomahawk missile on iran pakistan unrest khamenei death

us uses mysterious black tomahawk missile on iran pakistan unrest khamenei death

Follow Us
Follow Us:
  • रहस्यमय अस्त्राचा प्रहार
  • अदृश्य शिकारी
  • पाकिस्तानमध्ये उद्रेक

US attack on Iran Black Tomahawk news : इराण आणि इस्रायल-अमेरिका (israel iran war) यांच्यातील युद्ध आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे आधुनिक तंत्रज्ञान आणि विनाशाची नवी व्याख्या लिहिली जात आहे. अमेरिकन नौदलाने नुकताच इराणवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्याने जगभरातील लष्करी विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या हल्ल्यात प्रथमच ‘ब्लॅक टोमाहॉक’ (Black Tomahawk) या गूढ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र केवळ रंगाने काळे नसून, ते अमेरिकेचे एक असे ‘सायलेंट किलर’ आहे ज्याचा सुगावा शत्रूच्या प्रगत रडार यंत्रणेलाही लागला नाही.

काय आहे ‘ब्लॅक टोमाहॉक’चे रहस्य?

सामान्यतः टोमाहॉक क्षेपणास्त्रे ही राखाडी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. मात्र, इराणवरील कारवाईत दिसलेला हा गडद काळा रंग अमेरिकेच्या गुप्त ‘AGM-158C LRASM’ (लाँग-रेंज अँटी-शिप मिसाईल) सारखा आहे. विश्लेषकांचे असे मत आहे की, या क्षेपणास्त्रावर विशेष ‘रडार-शोषक’ (Radar-Absorbent) आणि ‘इन्फ्रारेड दमनशील’ कोटिंग करण्यात आले आहे. यामुळे क्षेपणास्त्र हवेत असताना शत्रूचे रडार लहरींना शोषून घेते, ज्यामुळे प्रतिहल्ला करणे अशक्य होते. सागरी लक्ष्यांविरुद्ध वापरण्यासाठी या काळ्या रंगाचा मोठा फायदा होतो. जेव्हा हे क्षेपणास्त्र समुद्राच्या लाटांच्या अगदी जवळून (Sea-skimming) प्रवास करते, तेव्हा त्याचा काळा रंग गडद निळ्या पाण्यासोबत मिसळून जातो. यामुळे शत्रूच्या जहाजांवरील रक्षकांना ते उघड्या डोळ्यांनी पाहणे किंवा ट्रॅक करणे अत्यंत कठीण जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

हाय-टेक फीचर्स: उड्डाणादरम्यान बदलणार लक्ष्य!

या नवीन क्षेपणास्त्राला ‘मेरीटाईम स्ट्राइक टोमाहॉक’ (MST) किंवा ‘ब्लॉक Va’ म्हटले जात आहे. यात ‘मल्टी-मोड गायडन्स सिस्टीम’ असून उड्डाण करत असतानाही हे क्षेपणास्त्र आपले लक्ष्य बदलू शकते. समजा, शत्रूचे जहाज किंवा लष्करी तळ आपली जागा बदलत असेल, तरीही टोमाहॉकची ‘द्वि-मार्गी डेटा लिंक’ (Two-way Data Link) त्याला रिअल-टाइम अपडेट्स देते. यामुळे अमेरिकेला इराणच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी तळांना आणि अणुप्रकल्पांना अचूकपणे उद्ध्वस्त करणे सोपे झाले आहे.

🚨🇺🇸 BREAKING: U.S. set to strike Iran using precision Tomahawk missiles! B-2 bombers led last summer’s attacks, but this time the focus shifts to long-range Tomahawks launched from ships & submarines over 1,000 miles away 🌊⚡. These missiles are incredibly precise, hitting… pic.twitter.com/JyQU3ObbG0 — WAR (@warsurv) January 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ

खामेनींच्या मृत्यूचे पडसाद: पाकिस्तानमध्ये ८ ठार

एकीकडे अमेरिकेने आपले सामर्थ्य दाखवले असताना, दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर मुस्लिम देशांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शिया आंदोलकांनी अमेरिकन दूतावासावर भीषण हल्ला चढवला. आंदोलकांनी सुरक्षा भिंती तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर झालेल्या चकमकीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील अनेक शहरांत आता ‘हाय-अलर्ट’ जारी करण्यात आला असून, परिस्थिती गृहयुद्धाच्या दिशेने सरकत असल्याचे चित्र आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्लॅक टोमाहॉक क्षेपणास्त्र इतर क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळे का आहे?

    Ans: यावर रडार-शोषक कोटिंग असते जे त्याला 'स्टेल्थ' (Stealth) बनवते, म्हणजेच ते रडारवर दिसत नाही. तसेच हे रात्रीच्या वेळी आणि समुद्रावर अदृश्य राहून हल्ला करते.

  • Que: पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला का झाला?

    Ans: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमधील शिया आंदोलकांनी अमेरिकेविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी हा हल्ला केला.

  • Que: मेरीटाईम स्ट्राइक टोमाहॉक (MST) चे वैशिष्ट्य काय?

    Ans: हे क्षेपणास्त्र उड्डाणादरम्यान आपले लक्ष्य बदलू शकते आणि समुद्रातील हालचाल करणाऱ्या जहाजांना अचूकपणे टार्गेट करू शकते.

Web Title: Us uses mysterious black tomahawk missile on iran pakistan unrest khamenei death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran Vs America
  • Israel Iran war
  • World War 3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.