Video SpaceX Starship launch fails again, rocket spirals out of control
वॉशिंग्टन: एक मोठी बातमी समोर येत आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने बुधवारी (२८ मे) स्टारशिप सुपर हेवी रॉटकेटची चाचणी केली. स्पेसएक्सने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण टेक्सासच्या बोका चिका बीचजवळ कंपनीच्या स्टारबेस लॉंच साइटवरुन ही चाचणी करण्यात आली. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. परंतु ही चाचणी अयस्वी ठरली आहे. यामुळे एलॉन मस्क आणि त्यांच्या स्पेसएक्सला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार सकाळी पहाटे ५ वाजता स्टारशिपचे प्रक्षेपण करण्यात आले. स्टारशिपचे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले खरे, पण प्रक्षेपणाच्या काही वेळानंतर स्टारशिपचे नियंत्रण सुटे आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना रॉकेट नष्ट झालेय स्पेसएक्सने या घटनेची सोशल मीडिया द्वारे पुष्टी केली. स्पेस एक्सने म्हटले की, प्रक्षेपण यशस्वीरित्या झाले, पण काही तांत्रिक अडचणींमुळे रॉकेटवरील नियंत्रण सुटले आणि रॉकेट पृथ्वीवर परतताना नष्ट झाली. सध्या यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
As if the flight test was not exciting enough, Starship experienced a rapid unscheduled disassembly. Teams will continue to review data and work toward our next flight test.
With a test like this, success comes from what we learn, and today’s test will help us improve Starship’s…
— SpaceX (@SpaceX) May 28, 2025
स्पेसएक्सने या मोहीमेला स्टारशिप फ्लाईट ९ असे नाव दिले होते. या रॉकेटमध्ये हेवी बूस्टर आणि शिप ३५ चा वापर करण्यात आला होता. सूपर हेवी बूस्टरने यापूर्वी फ्लाइट ७ वर उड्डाण केले होते. याआधीच्या उड्डाणांमध्येही तांत्रिक बिघडांमुळे मोहीमेत अडचमी निर्माण झाल्या होत्या.
या रॉकेटमध्ये ३३ रॅप्टर इंजिन आहे. यातील २९ इंजिन उड्डाणादरम्यान सुरु करण्यात आली होती. तसेच स्टारशिपने हॉस्ट-स्टेजिंग नावाची एक महत्त्वाची प्रक्रिया देखील पुर्ण केली आहे. यातील पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे. सध्या २९ मे पर्यंत पुढील प्रक्षेपण टाळण्यात आले आहे.
Hotstaging and sporty flip! 🙂
COME ON SHIP 35! pic.twitter.com/Tv1XcjSJfv
— NSF – NASASpaceflight.com (@NASASpaceflight) May 27, 2025
दरम्यान स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, स्टारशिपची चाचणी अयशस्वी झाली. काही तांत्रिक समस्यांमुळे सध्या प्रक्षेपण टाळण्यात येत आहे.यासाठी स्पेसएक्स पुन्हा प्रयत्न करेल असे मस्क यांनी म्हटले आहे.
शिवाय मस्क यांचा स्टारशिप ही योजना बहुउद्देशीय आहे. या योजनेअंतर्गत म्सक यांना मानवाला चंद्र, मगंळाच्याही पलीकडे जायचे आहे.यासाठी स्पेसएक्स एक मोठे ठोस पाऊल उचलणार आहे.