Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vietnam Boat Accident : व्हिएतनाममध्ये भीषण अपघात! पर्यटक बोट उलटून १५ भारतीयांचा मृत्यू; सरकारकडून चौकशीचे आदेश

Vietnam Boat Accident Update : व्हिएतनाममध्ये एक पर्यटकांची बोट उलटली असून यामध्ये १५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भारतावर शोककळा पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 03:02 PM
Vietnam Boat Accident

Vietnam Boat Accident

Follow Us
Follow Us:
  • व्हिएतनाममध्ये पर्यटल बोट उलटून भीषण अपघात
  • १५ भारतीयांचा मृत्यू
  • बचावकार्य अद्याप सुरुच
Vietnam Boat Accident News in Marathi : हनोई : व्हिएतनाममध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एन गियांग प्रांतातील किनाऱ्याजवळ शनिवारी (११ जुलै) एक पर्यटक बोट उलटली. या बोट दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे पर्टकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे भारत आणि व्हिएतनामवर शोककळा पसरली आहे.

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप

मीडिया रिपोर्टनुसार, या स्पीडबोटीत एकूण ३६ जण प्रवास करत होते. यामध्ये ३२ भारतीय पर्यटक, एक व्हिएतनामी टूर गाईड आणि तीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यातील काही लोकांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यातील दोन भारतीयांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिएतनामकडून तीव्र संवेदना व्यक्त

या दुर्घटनेनंतर व्हिएतनामचे राष्ट्राध्य टो लाम आणि पंतप्रधान ले मिन्ह हंग यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकसंदेश पाठवला. या संदेशात व्हिएतनामने भारतीय मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या कठीण काळात भारतासोबत असल्याचे म्हटले.

बचाव कार्य अद्यापही सुरु

सध्या व्हिएतनाम सरकारने शोध आणि बचाव मोहिम वेगान सुरु ठेवली होती. दुपारी ३.३० पर्यंत सर्व पर्टकांना बाहेर काढण्यात आले. यातील १५ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपण निश्चित झाले आहेत.

अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असून याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हवामानाची परिस्थिती, बोटाची तांत्रिक स्थिती आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का याची चौकशी केली जात आहे.

व्हिएतनाम सरकारकडून बोट अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले आहे.

नुकसानभरपाईची घोषणा

या दुर्घटनेनंतर बोट मालकाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १००० अमेरिकन डॉलर तर जखमींना ५०० अमेरिकन डॉलर देण्यात येणार आहेत. तसेच एन गियांग प्रांत आणि फु क्वोक स्पेशल झोन सरकारकडूनही मृतांच्या कुटुंबीयांना सुमारे २६ दशलक्ष व्हिएतनामी डॉंग आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.

व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री ले होई ट्रुंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून घटनेवर शोक व्यक्त केला. मृतांची ओळख पटवणे, आवश्यक कादपत्रांची पूर्तता आणि पार्थिव भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दोन्ही देश समन्वयाने काम करत असून जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्घ करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

🚨 PHU QUOC BOAT DISASTER: THEY HAD LIFE JACKETS – BUT MANY WERE HOLDING THEM, NOT WEARING THEM A haunting new detail has emerged from the speedboat tragedy off Vietnam’s Phu Quoc Island, which killed 15 Indian tourists and left 21 people alive. Who were the passengers? The 32… pic.twitter.com/uD9X43qinZ — NGO-SUGAR (@ngosugartp) July 12, 2026


PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? नॉर्वेनंतर न्यूझीलंडच्या पत्रकारानेही विचारला प्रश्न; MEA ने दिलं स्पष्टीकरण

Web Title: Vietnam boat accident 15 indian tourists die rescue operation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Boat Accident
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.