SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
१० जुलै रोजी बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (BIISS) येथे आयोजित सार्क विषयांवरील परिसंवादात ही घटना घडली. भारतातील बांगलादेशी माजी उच्चायुक्त अहमद तारिक कमीर यांनी रिब्लिडिंग ट्रस्ट, रिन्यूइंग रिजिनल इन्टिग्रेशन पाथवे फॉर रिव्हिटलाइजिंग सार्क या विषयावर प्रझेंटशन करत होते.
यावेळी प्रेझेंटशनमध्ये दाखवण्यात आलेल्या एका नकाशात जम्मू-काश्मीरचा चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. यावर भारतीय उच्चायोगातील सेकंड सेक्रेटरी पूजा कुमारी झा यांनी तातडीने प्रेझेंटनशन थांबवले. त्यांनी स्पष्ट केले की, हा नकाशा चुकीचा आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अहमद तारिक करीम यांनी हा नकाशा केवळ प्रेझेंटशनसाठी वापरला असून तो अधिकृत सीमारेषा दर्शवत नसल्याचे म्हटले. परंतु यावर पूजा झा यांनी भारताची अधिकृत भूमिका पुन्हा स्पष्ट केले. पुन्हा जम्मू-काश्मीरबाबत कोणतीही चुकीची माहिती सादर होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.
पूजा झा यांना अहमद तारिक करीम यांनी तुम्ही भारतातून आहात का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना झा यांनी भारतीय उच्चायोगातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर करीम यांनी त्यांचा आक्षेप नोंदवून घेत असल्याचे सांगत प्रेझेंटेशन सुरु ठेवले.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी पूजा झा यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी भारताची भूमिका योग्य वेळी ठामपणे मांडल्याचे म्हटले.
यापूर्वी देखील जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमझ्ये भारताच्या सीमांबाबत चुकीची माहिती सादर झाल्यास भारताकडून तात्काळ आक्षेप नोंदवण्यात येतो.
India’s Second Secretary at the Indian High Commission in Dhaka, Puja Jha, raised an immediate objection after a map shown during a foreign policy seminar in Bangladesh depicted Jammu & Kashmir as part of Pakistan. She stated that Jammu & Kashmir is an integral and inalienable… pic.twitter.com/a4b2IV8ZhA — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 10, 2026
Venezuela Earthquake : भूकंपानंतर सर्वत्र हाहा:कार; तब्बल ४,३३३ लोकांचा बळी, हजारो जखमी






