Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ

War Deaths : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या युद्धामुळे सामान्यांचा बळी गेला असून अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 04:49 PM
Middle east war

Middle east war

Follow Us
Follow Us:
  • इराण युद्धात अमेरिका-इस्रायलपेक्षा भारतीयांचा सर्वाधिक बळी
  • भारतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
  • सरकारकडून आखाती देशांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आवाहन
War Deaths : मध्यपूर्वेतील अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष सध्या काही काळासाठी निवळला आहे. परंतु या युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी या विनाशकारी युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेकडो सामान्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. धक्कादायक म्हणजे या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. खाडी देशांतील अनेक भारतीय कामगारांनी आपले प्राण गमावले असल्याचे काही अहवालांमध्ये सागंण्यात आले आहे.

El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरातील El Nino चे भयानक दृश्य

नुकतेच, कतारमधील रास लाफान येथे झालेल्या भीषण स्फोटात १२ कामागारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवाय होर्मुझ सामुद्रधुनीतही सहा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका-इराणच्या व्यापारी जहाजांवरही हल्ल्यांमुळे अनेक भारतीय होर्मुझ समुद्रात अडकनू पडले आहे. सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे परिस्थिती बिकट झाली होती. ज्यामुळे युद्ध थांबले असले तरी भारतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आखाती देशांवर इराण हल्ल्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. सौदी अरेबिया, यूएई, कतार यांसारख्या अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय काम करतात. या हल्ल्यांमुळे मात्र त्यांचे जीवन धोक्यात आले होते.

भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी भारतीय नागरिक असलेल्या जहांजांवरील अमेरिकेच्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या हल्ल्यांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला होता. यामुळे भारत आणि अमेरिकेत काहीसा तणाव निर्माण झाला आहे.

परंतु अस्थिर परिस्थिती पाहता परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक भारतीय परदेशात अडकून पडले असून त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. विदेशी सरकारसोबत संपर्क साधून नागरिकांची सुरक्षितता निश्चित केली जात आहे.

अमेरिका-इराणमध्ये ६० दिवसांची युद्धबंदी

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या ६० दिवसांची युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून यातील पहिली फेरी पार पडली आहे. यामुळे होर्मुझचा मार्ग लवकरच सुरु केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु तणाव कायम आहे. यामुळे युद्ध पुन्हा भडकू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन आखाती देशांना केले आहे. तसेच अमेरिका-इराणकडे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली जात आहे.

होर्मुझ उघडताच शत्रूची धुर्त खेळी; पाकिस्तानच्या ‘या’ निर्णयामुळे भारतावर ओढवणार महाभंयकर संकट

Web Title: War deaths indians suffer most in iran israel us conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.