El Nino : भारतावर महासंकट! नासाच्या सॅटेलाईटने टिपलं प्रशांत महासागरतील El Nino चे भयानक दृश्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
११ जून रोजी अमेरिकेच्या हवामान विभागाने एल निनोच्या सक्रिय होण्याची अधिकृत घोषणा केली होती. सध्याची परिस्थिती १९९७ मध्ये आलेल्या गॉडझिला एल निनो सारखी शक्तिशाली असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. यामुळे यंदा एल निनो अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोचा प्रभाव केवळ प्रशांत महासागरापुरता मर्यादित नाही. याचा जगभरातील तापमानवाढ आणि पर्जन्यमानावरही परिणाम होतो. हवामानातील अस्थिरतेसाठी एल निनो कारणीभूत असतो. भारतात एल निनोमुळे मान्सूनची शक्यता कमी झाली आहे. यामुळे शेती, जल संवर्धन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे भारतीय हवामानतज्ज्ञ प्रशांत महासागरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवून आहेत.
भारताच्या शेतीवर परिणाम झाल्यास भाजीपाला, डाळी, धान्याचे भाव वाढू शकतात. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवेल. यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो. सामान्यांच्या रोजच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन आर्थिक भार वाढू शकतो.
एल निनोमुळे अल निनोमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियातही पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे भीषण दुष्काळ पडू शकतो असे हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. युरोप खंडातही परिस्थिती बिकट होऊ शकते. वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यवर याचा परिणाम होऊ शकतो.
एल निनो प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याच्या तापमानाशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत प्रशांत महासागरातील पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते. या उष्ण पाण्यामुळे हवामानात बदल होतो ज्याचा संपूर्ण जगातील पावसावर परिणाम होतो. भारतात एल निनो आला म्हणजे पाऊस कमी पडतो.
El Niño was still strengthening in June 2026, with satellite sea-surface-height anomalies and more warm Kelvin waves appearing to approach the eastern Pacific. @NASA https://t.co/LFSaayNtMz — Phys.org (@physorg_com) June 22, 2026






