What will happen if Pakistanis do not return on timeKnow what will be India's next step
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 17 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली. या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधत कडक कारवाई करत काही निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानन संतप्त झाला आहे.
भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेत लोकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अटारी-वाघा बॉर्डर देखील 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. वैद्यकीय व्हिसा धारकांना देश सोडण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची व्हिसाची मुदत रविवारी (27 एप्रिल) संपला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास त्यांच्यावर इमिग्रेशन ॲड फॉरेनर्स ॲक्ट 2025 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
प्रोटोकॉल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या आदेशानंतर रविवारपर्यंत 537 नागरिक पाकिस्तानत परतले आहेत. तसेच या काळात 1 हजार 387 भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशात परतले आहे. रविवारी 237 नागरिक अटारी-वाघा बॉर्डरवरुन परतले आहेत. तर 166 भारतीय नागरिक परत आले आहे. वैद्यकीय व्हिसा धारकांना 29 एप्रिलपर्यंत बारत सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भारताने केवळ पाकिस्तानी नागरिकच नव्हे तर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असेलेल्या अधिकाऱ्यांना देखील देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 13 पाकिस्तानी राजदूत आणि अधिकारी देश सोडून पाकिस्तानात परतले आहेत. भारत सरकारे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे म्हटले आहे.
SAARC व्हिसा धारकांसाठी 26 एप्रिल ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. तर इतर सर्व व्हिसा धारकांना 27 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. वैद्यकीय व्हिसा धारकांना 19 एप्रिललपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि क्रेंद्रशासित प्रदेशांना पाकिस्तानी नागरिकांची ओळखपटवून त्यांना अंतिम मुदतीच्या आत भारत सोडण्याची खात्री करण्याचे आदेश जारी केले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलू या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्धारित वेळेपर्यंत पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले नाही तर त्यांना हद्दपार करण्यात येऊ शकते. तसेच त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाभ शकते. या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण सहन केला जाणार नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
दरम्यान भारताला पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांची पुरावे सापडले आहेत. यानंतर भारताने तातडीन कारवाई करत, दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.