ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासुन सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये काही ना काही बदल करण्याचा धडाकाच लावला आहे. आता ते लवकरच त्यांच सीईओ पद सोडणार असून, ट्विटरला नवीन सीईओ शोधला आहे आहे. कंपनीच्या नवीन सीईओ म्हणून एका महिलेची निवड करण्यात आली आहे. ती येत्या ६ आठवड्यांत कंपनीत रुजू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, NBC युनिव्हर्सलच्या शीर्ष जाहिरात विक्री कार्यकारी लिंडा याक (inda Yaccarino) ट्विटरच्या नवीन सीईओपदी रुजू होऊ शकतात.
[read_also content=”इलॉन मस्क ट्विटरचे सीईओ पद सोडणार, आता एका महिलेच्या हातात देणार सर्व सूत्रे https://www.navarashtra.com/world/elon-musk-will-step-down-as-ceo-of-twitter-handing-all-the-reins-to-a-woman-nrps-398039.html”]
लिंडाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये आहे. ती सध्या ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिप्सच्या चेअरपर्सन म्हणून काम करते. याआधी ती कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागात काम करत होती. लिंडाने टर्नर येथे 19 वर्षे काम केले. तेथे ती कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, विपणन आणि संपादन होती. ती पेन स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती. येथे त्यांनी लिबरल आर्ट्स आणि कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, लिंडाने तिच्या मित्रांना सांगितले होते की तिला ट्विटरची सीईओ बनायचे आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील सीईओ म्हणून एला इर्विनबद्दल देखील चर्चा झाली आहे. इर्विन हे सध्या Twitter च्या ट्रस्ट आणि सेफ्टी एफर्ट्स विभागाचे प्रमुख आहेत.