Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट

Australia Bondi Beach Attack : सिडनी येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबाराने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. या प्रकरणाता पाकिस्तानी बाप-लेकाचा हात असल्याचे समोर आले आहे. तसेच याबाबत आणखी धक्कादायक दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 07:20 PM
who is rabbi Eli Schlanger targeted in sydney attack connected to Mumbai 2611 Terrorists attack 

who is rabbi Eli Schlanger targeted in sydney attack connected to Mumbai 2611 Terrorists attack 

Follow Us
Close
Follow Us:
  • सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध?
  • दहशतवाद्यांनी या खास व्यक्तीला केले होते टार्गेट
  • काय आहे नेमकं प्रकरण?
Sydney Bondi Beach Attack News Marathi : कॅनबेरा/नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी येथे बोंडी बीच परिसरात सामूहिक गोळीबार (Firing) करण्यात आला होता. रविवारी (१४ डिसेंबर) घडलेल्या या घटनेने केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले होते. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू आणि ४० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच दोन पाकिस्तानी नागरिक बाप-लेकाच्या जोडीने हा हल्ला घडवला असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. दरम्यान या हल्ल्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचा भारताच्या मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशवादी हल्ल्याशी (26/11 Terror Attack) संबंध असल्याचा दावा केला जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊयात

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

काय आहे २६/११ शी सिडनी हल्ल्याचा संबंध?

मिळालेल्या माहितीनुसार, सिडनीतील हल्ल्यात ४१ वर्षीय रब्बी एली श्लांजरला ठार करण्यात आले आहे. २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी याचा थेट संबंध जोडला जात आहे. श्लांजर हा २६/११ मध्ये शहीद झालेल्या चाबाड मिशनच्या स्मरणार्थ कार्यक्रमात सहभागी झाला होता. यामुळेच त्याची दहशतवाद्यांनी हत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. बोंडी बीचवर हनुक्का उत्सव साजरा करण्यासाठी ज्यू समुदायाचे लोक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी त्यांच्यावर रक्तरंजित प्रहार करण्यात आला. पण हा हल्ला रब्बी श्लांजरला लक्ष्य करुन करण्यात आला होता.

रब्बी श्लांजर गेल्या १८ वर्षांपासून सिडनी येथे चाबाड बोंडी येथे सहाय्यक रब्बी म्हणून कार्यरत होता. त्याच्या चुलत भावाने रब्बीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याच्या पाश्चात्य पत्नी, दोन लहान आणि मुले आणि मोठा परिवार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या यहुदी परिषदेचे सीईओ अॅलेक्स रविचत यांनी सांगितले की, श्लांजर हे तुरुंगातील कैद्यांना भेट देत, वृदधांसोबत वेळ घालवत, तसेच गरजूंना मदत करत.

हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंडी बीच परिसराती हल्ला हा पाकिस्तानी नागरिक बाप-लेकाच्या जोडीने घडवून आणला आहे. चकामकीत वडीलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलाला अटक करण्यात आली आहे. या २४ वर्षीय आरोपीचे नाव नवीद अकमरम असून हा पाकिस्तानी नागिरका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवीद हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त जनरल सादिक अकरम यांचा मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात २ पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण ऑस्ट्रिलेयातील धार्मिक स्थळांची सुरक्षितता कडक करण्यात आली आहे.

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिडनीतील बोंडी बीच हल्ल्याचा मुंबई दहशतवादी हल्ल्याशी का संबंध जोडला जात आहे?

    Ans: यामागचे कारण म्हणजे सिडनीतील हल्ल्यात रब्बी श्लांजर या व्यक्तीला ठार करण्यात आले असून ते नुकतेच २००८ मध्ये २६/११ ला झालेल्या मुंबई हल्ल्याच्या चाबाड चाबाड मिशनशी जोडले गेले होते.

  • Que: ऑस्ट्रेलियाच्या सिडीन परिसरातील बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यात किती आरोपींचा समावेश आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियाच्या सिडीन परिसरातील बोंडी बीचवर झालेल्या दोन आरोपीं पाकिस्तानी नागरिका बाप-लेकाच्या जोडीचा समावेश आहे.

  • Que: बोडीं बीचवरील हल्ला दहशतवादी हल्ला का मानला जात आहे?

    Ans: यहुदी समुदायाच्या पवित्र सण हनुक्का साजरा केला जात असताना बोंडी बीचवर हल्ला करण्यात आला होता. यामुळे हा हल्ला दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

Web Title: Who is rabbi eli schlanger targeted in sydney attack connected to mumbai 2611 terrorists attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • 26/11 mumbai Terror Attack
  • Australia
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले
1

भारताने घेतला हिंदूंच्या हत्येचा बदला? बांगलादेशला मिळणाऱ्या निधीला लावली कात्री, युनूस सरकार हादरले

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?
2

चाबहार प्रकल्पाला मोठा धक्का! २०२६ च्या अर्थसंकल्पात निधी ‘शून्य’, ट्रम्पच्या निर्बंधांपुढे झुकले मोदी सरकार?

Maduro तुरुंगात अन् Venezuela अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांच्या त्या निर्णयाने उडाली जगाची झोप
3

Maduro तुरुंगात अन् Venezuela अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांच्या त्या निर्णयाने उडाली जगाची झोप

Iran Blast : युद्ध की घातपात? इराणमध्ये एकामागून एक भीषण धमाके; हल्ला असल्याचा संशय
4

Iran Blast : युद्ध की घातपात? इराणमध्ये एकामागून एक भीषण धमाके; हल्ला असल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.