Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US Tensions : इराण-अमेरिकेतील संबंध पुन्हा ताणले जाणार? सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतापला; म्हटले, ‘अमेरिका हा देश…’

क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि सुरुंग पेरणाऱ्या बोटींना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली होती, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 07:04 AM
Iran-US Tensions : इराण-अमेरिकेतील संबंध पुन्हा ताणले जाणार? सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतापला; म्हटले, 'अमेरिका हा देश...'

Iran-US Tensions : इराण-अमेरिकेतील संबंध पुन्हा ताणले जाणार? सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतापला; म्हटले, 'अमेरिका हा देश...'

Follow Us
Follow Us:

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दक्षिण इराणमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर, तेहरानने अमेरिकेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आणि दुष्ट हेतू दाखवल्याचा आरोप केला आहे. इराणने म्हटले की, आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. दरम्यान, अनेक दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा हळूहळू पूर्ववत केली जात आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी, तेल पुरवठा आणि शस्त्रसंधीच्या चर्चांमुळे जगाचे लक्ष आखाती प्रदेशावर केंद्रित झाले आहे. अमेरिकेच्या लष्कराने दक्षिण इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला केला. क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि सुरुंग पेरणाऱ्या बोटींना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली होती, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेने संयमाने कारवाई केल्याचा दावा केला, परंतु इराणने याला शस्त्रसंधीचे थेट उल्लंघन म्हटले आहे.

अमेरिका विश्वासार्ह नाही आणि आता कोणत्याही परिणामांसाठी वॉशिंग्टन जबाबदार असेल. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने त्यांच्या हवाई हद्दीत घुसलेला एक ड्रोन पाडल्याचा आणि दुसऱ्या ड्रोन व एका लढाऊ विमानाला माघार घेण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, शस्त्रसंधी वाढवणे आणि परिस्थिती सामान्य करण्याच्या उद्देशाने इराण आणि अमेरिका यांच्यात कतारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, ताज्या हल्ल्यांनंतर परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली आहे. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची कतारहून परतले आहेत. पुढील कार्यवाहीच्या दिशेबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट विधान करण्यात आलेले नाही.

इस्रायलचा लेबनॉनवर भीषण प्रहार

मध्यपूर्वेत पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे अमेरिका इराणमधील तणाव (US Iran Conflict) निवळण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ले चढवले आहेत. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली असून क्षणात सर्व उद्ध्वस्त झाले आहे.

भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा

नुकतेच भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी भारत आणि कॅनडाच्या द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना मजबूत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांनी सर्वसमावेशक भागीदारी बळकट करण्याच्या काराराला या वर्षाच्या अखेरीस अंतिम रुप देण्याचे निश्चित केले. यामुळे भारत कॅनडाच्या संबंधान एक नवी दिशा मिळणार आहे.

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर

Web Title: Will iran us relations become strained once again iran outraged by continuous attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:04 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक
1

Donald Trump: इराणी राजकारण अन् ‘मोहम्मद’ नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
2

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित
3

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
4

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.