Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

US Russia Oil Tariff Decision : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या प्रमुख देशांवर १०० टक्के आयात शुल्क लादण्याच्या आपल्याच भूमिकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा यु-टर्न घेतला आहे. अमेरिकेने नुकत्याच मंजूर केलेल्या कायद्याअंतर्गत या कडक टॅरिफला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 17, 2026 | 11:36 AM
100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! ( सौजन्य - सोशल मीडिया )

100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न!
  • भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित
  • एक नवीन परस्थिती निर्माण
US Russia Oil Tariff Decision : अमिरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणकडून सर्वाधिक तेल वायू खरेदी करणाऱ्या देशांना दणका देत त्यांच्यावर १००% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी, ट्रम्पयांनी एका कार्यकारी आदेशाद्वारे याबाबत स्पष्ट केलं. पण नेमका हा युटर्न का घेण्यात आला? काय आहे यामागचं कारण? ( US Russia Oil Tariff Decision )

एका कार्यकारी आदेशात म्हणण्यात आलं की, अंमलबजावणीची अंतिम मुदत जवळ आलेल्या अनेक निर्बंध, प्रतिबंध आणि शुल्कांमधून सूट जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीनसारख्या देशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, जे आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतात.

फक्त बँक खाते उघडून चालणार नाही! स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही मिळायला हवे; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

एक नवीन परस्थिती निर्माण

हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिका रशियावर दबाव वाढवण्यासाठी आणि युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी आपल्या रणनीतीवर चर्चा करत आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्धच्या अमेरिकेच्या व्यापारी कारवाईबाबत एक नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

100% टॅरिफ लावण्याची ट्रम्पची योजना काय?

सप्टेंबर २०२६ च्या मध्यामध्ये, ट्रम्प यांनी ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ २०२६’ वर स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीनंतर भारतासह जगातील ५ देशांना चांगलाच दणका बसला.या कायद्यानुसार रशियाकडून तेल किंवा वायू खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर आर्थिक उपाययोजना करणे अनिवार्य करण्यात आलं.
या प्रस्तावानुसार, रशियन कच्च्या तेलाच्या किंवा वायूच्या पाच सर्वात मोठ्या आयातदारांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर १००% पर्यंत शुल्क आकारले जाणार होते. इतकंच नाही तर कायदा लागू झाल्यानंतरही रशियाकडून तेल किंवा वायू खरेदी करणाऱ्या देशांना लक्ष्य करण्याची तरतूदही करण्यात आली होती. रशियाला निर्बंध टाळण्यास मदत करणाऱ्या देशांवरही कारवाई करण्याचं प्रयोजन होतं.

मात्र, ट्रम्प यांनी आता या कायद्यांतर्गत असलेले काही निर्बंध आणि शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी काँग्रेसला पाठवलेल्या एका प्रमाणपत्रात त्यांनी म्हटले आहे की, सध्या या सवलती देणे हे अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचे आहे.

ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न का?

ट्रम्प यांच्या निर्णयामागील महत्त्वाचा मु्द्दा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय हीत असल्याचं त्यांनी नमुद केलं. त्यांनी दिलेल्या कार्यकारी आदेशात, त्यांनी म्हटले आहे की ही सूट याच आधारावर देण्यात आली होती. पण या आदेशात या निर्णयामागील संपूर्ण कारणांचे सविस्तर स्पष्टीकरण दिलेले नाही.
यावरुन निश्चितपणे असे दिसून येते की, रशियावर दबाव आणण्यासाठी प्रस्तावित शुल्कांच्या अंमलबजावणीबाबत अमेरिकन प्रशासन सध्या लवचिक भूमिका घेत आहे. यापूर्वी, भारतासह अनेक देशांनी रशियावरील निर्बंधांशी संबंधित या कायद्याच्या संभाव्य व्यापारी परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

या परिस्थितीचा भारताल कसा फायदा?

भारत आणि चीन हे रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांपैकी आहेत. त्यामुळे, जर अमेरिकेने भारतीय मालावर १००% पर्यंत अतिरिक्त शुल्क लादले, तर त्याचा भारतीय निर्यातदारांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. प्रस्तावित शुल्क सध्याच्या अमेरिकन शुल्कांव्यतिरिक्त लादले जाऊ शकते. पण, त्याचा प्रत्यक्ष परिणाम विशिष्ट देश आणि त्यात समाविष्ट असलेल्या विशिष्ट उत्पादनांवर अवलंबून असेल.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, रशियन तेल खरेदीचा मुद्दा यापूर्वी भारत-अमेरिका व्यापारी संबंधांमध्ये तणावाचे कारण ठरला आहे. २०२५ मध्ये, ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर २५% अतिरिक्त शुल्क लादले. त्याचबरोबर २५% प्रतिशोधात्मक शुल्कही लादण्यात आले. फेब्रुवारी २०२६ मध्ये, भारत-अमेरिका व्यापार चौकटीअंतर्गत हे अतिरिक्त शुल्क हटवण्यात आले आणि प्रतिशोधात्मक शुल्क १८% पर्यंत कमी करण्यात आले.

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Web Title: Trump u turn waives 100 percent tariff on russia oil buyers india china marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
1

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय
2

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’
3

Russia-Ukraine News : ट्रम्प यांची झेलेन्स्की यांना खुर्ची सोडण्याची सूचना; ‘आमचा नेता आम्हीच ठरवणार!’

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?
4

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.