Will Russia enter the war After the US attack, Aragchi leaves for Russia to meet Putin
तेहरान : मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराणमधील सुरु असलेल्या युद्धात आता अमेरिकेचे एन्ट्री झाली आहे. अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला आहे. यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच वेळी इराण आता मदतीसाठी रशियाकडे धाव घेतली आहे. रशिया हा इरणचा मजबूत भागीदार आहे. यामुळे कठीण काळात रशियाकडून मदतीची अपेक्षा ठेवत इराणते परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची मॉस्कोला रवाना झाले आहेत.
इस्रायलच्या १३ जून रोजी केलेल्या हल्ल्याचा रशियाने निषेघ केला आहे. तसेच मध्यस्थीची ऑफर देखील इराणला दिली आहे. याच वेळी अमेरिकेने युद्धात इस्रायलला इराणवर हल्ला करुन उघड पाठिंबा दर्शवला आहे. या परिस्थितीत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशियाला रवाना झाले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता केवळ राजनियकता हा पर्याय उरलेला नाही. यामुळे मी मॉस्कोला रवाना होत आहे. सोमवारी सकाळी पुतिन यांची भेट घेणार असल्याचे अराघची यांनी सांगितले.
अब्बास अराघची यांच्या या विधानावरुन आता या युद्धात रशिया देखील उडी मारण्याची शक्यता आहे. रशियाने उघडपणे आपला पाठिंबा इराणला दर्शवला नाही परंतु पुतिन यांनी यापूर्वी इराणच्या अणुप्रकल्पावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे रशिया युद्धात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेने इराणवर हल्ला करुन लाले रेषा ओलांडली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले आहे की, राजनैतिक आणि कुटनीतिचे दरवाजे आता खुले करण्याची गरज आहे. यावरुन स्पष्ट होते की इराण देखील अमेरिकेवर प्रतिघात करण्याच्या तयारीत आहे.
याच दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलावर सुमारे ३० क्षेपणास्त्रांचा मारा इराणने केला आहे. यामुळे सध्या तेल अवीव मध्ये मोठ्या विनाशाची शक्यता निर्माण झाली आहे.
याच वेळी पंतप्रधान मोदी यांनी देखील इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन इराणला केले आहे. पंतप्रधान मोदींनी प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य पुन्हा पुनर्संचयित करण्याची मागणी केली.