आता चीनला धडा शिकवण्याची तयारी करत आहे अमेरिका; दुसऱ्या महायुद्धातील लष्करी तळ उघडले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US reactivating WWII airbases Pacific 2026 : प्रशांत महासागर (Pacific Ocean) क्षेत्रात चीनच्या वाढत्या दादागिरीला चाप लावण्यासाठी अमेरिकेने आता आपल्या लष्करी इतिहासातील सर्वात प्रभावी पानांना पुन्हा उजाळा देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ८० वर्षांनंतर, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानला धूळ चारण्यासाठी वापरलेले हवाई आणि नौदल तळ पुन्हा सक्रिय करत आहे. टिनियन, ग्वाम, पलाऊ आणि याप यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या तळांवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून, अमेरिकन अभियंते २४ तास तैनात आहेत.
🇺🇸⚔️🇨🇳 The US only understands force: Taiwan is the next testing ground for pressure on China After the PLA’s “Mission of Justice 2025” exercises, former US Navy Rear Admiral Mark Montgomery openly called China “bullies” and called on Washington to speed up arms deliveries to… pic.twitter.com/KDUYlZ4tGJ — Hawkeye1812Z (@Hawkeye1745) January 4, 2026
credit : social media and Twitter
दुसऱ्या महायुद्धात ज्या टिनियन बेटावरून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकण्यासाठी विमाने पाठवली होती, तेच टिनियन आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथील ‘नॉर्थ फील्ड’ (North Field) हवाई पट्टीवर साचलेली झाडेझुडपे साफ करून तिचे आधुनिकीकरण करण्यासाठी अमेरिकेने सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्स (३३०० कोटींहून अधिक रुपये) खर्च करण्याची योजना आखली आहे. चीनच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून (उदा. DF-26 ‘गुआम किलर’) वाचण्यासाठी अमेरिकेला अशा पर्यायी तळांची अत्यंत गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
अमेरिकन हवाई दलाने (US Air Force) आता आपली रणनीती बदलली आहे. एकाच मोठ्या तळावर (उदा. अँडरसन एअर फोर्स बेस, गुआम) सर्व विमाने ठेवण्याऐवजी, ती पॅसिफिकमधील विविध छोट्या बेटांवर विखुरली जाणार आहेत. यालाच ‘अॅजिल कॉम्बॅट एम्प्लॉयमेंट’ असे म्हटले जाते. यामुळे चीनला अमेरिकेची सर्व विमाने एकाच वेळी नष्ट करणे अशक्य होईल. पलाऊमधील पेलिलिअु बेटावरील जुनी धावपट्टी आणि याप बेटावरील विमानतळाचे विस्तारीकरण हे याच योजनेचा भाग आहे.
अमेरिकेने विकसित केलेला हा ‘सेंट्रल एअर कॉरिडॉर’ म्हणजे केवळ विमानतळ नाहीत, तर ती एक संपूर्ण रसद साखळी (Supply Chain) आहे. भविष्यात तैवान किंवा दक्षिण चीन समुद्रात युद्ध झाल्यास, जपान आणि फिलीपिन्समधील तळांना मदत करण्यासाठी ग्वाम आणि टिनियन हे मुख्य केंद्र असतील. येथे नवीन इंधन साठवण सुविधा, दारुगोळा डेपो आणि प्रगत रडार यंत्रणा बसवली जात आहे. चीनने आपल्या कृत्रिम बेटांवर केलेल्या लष्करी बांधकामाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेची ही ‘बेटांची साखळी’ (Island Chain Strategy) महत्त्वाची ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर
तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अत्यंत संवेदनशील आहे. चीन ज्या गतीने आपल्या नौदलाचा विस्तार करत आहे, त्या तुलनेत अमेरिकेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या जुन्या तळांचा आधार घ्यावा लागत आहे. जपानमध्ये ३६ नवीन F-15EX फायटर जेट्सची तैनात करणे आणि आशियातील इतर देशांशी लष्करी करार करणे, यावरून अमेरिकेने चीनला धडा शिकवण्याची पूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.
Ans: चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीला रोखण्यासाठी आणि एकाच मुख्य तळावर अवलंबून न राहता विखुरलेल्या ठिकाणी लष्करी ताकद वाढवण्यासाठी अमेरिका हे पाऊल उचलत आहे.
Ans: टिनियन हे ग्वामपासून जवळ आहे आणि दुसऱ्या महायुद्धात जपानवर हल्ले करण्यासाठी हे प्रमुख केंद्र होते. आता चीनच्या क्षेपणास्त्र टप्प्याबाहेर राहून प्रतिहल्ला करण्यासाठी याचा वापर होईल.
Ans: चीनचे DF-26 हे क्षेपणास्त्र, ज्याला 'गुआम किलर' म्हटले जाते, ते अमेरिकेच्या पॅसिफिकमधील प्रमुख तळांना लक्ष्य करू शकते.






