ISI Spy Network Alert: भारतात बांगलादेश-नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानचा वापर हनी ट्रॅप शस्त्र म्हणून ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ISI honey trap Indian Army news : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) पाकिस्तानच्या नापाक इराद्यांबाबत एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. सीमेवरून दहशतवादी पाठवण्यात वारंवार अपयश आल्यानंतर आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) भारतामध्ये ‘अंतर्गत अस्थिरता’ निर्माण करण्यासाठी नवीन रणनीतीवर काम करत आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर निदर्शने घडवून सत्तांतर किंवा अराजकता निर्माण करण्यात आली, तसाच प्रयोग भारतात करण्याचा कट रचला जात असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
आयडीआरडब्ल्यू (IDRW) च्या अहवालानुसार, पाकिस्तान आता केवळ शस्त्रास्त्रांनी युद्ध न लढता ‘माहिती युद्ध’ (Information Warfare) लढत आहे. भारतीय सशस्त्र दलांना (Indian Armed Forces) बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात आहे. लष्करी मोहिमांबद्दल संभ्रम निर्माण करणे आणि लष्कराने मानवाधिकार उल्लंघन केल्याचे खोटे दावे करणे, हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. यामुळे सामान्य जनतेचा सैन्यावरील विश्वास कमी व्हावा, असा आयएसआयचा कुटील डाव आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Intervention : ‘इराक ते व्हेनेझुएला…’अमेरिकेचा युद्ध घडवण्याचा डर्टी गेम; खळबळजनक अहवालामुळे ट्रम्पची काळी कृत्ये जगासमोर
गुप्तचर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय भारतीय अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ (Honey Trap) चा वापर प्राथमिक शस्त्र म्हणून करत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाईल्स तयार करून लष्करी कर्मचाऱ्यांशी मैत्री केली जाते आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून गोपनीय माहिती मिळवली जाते. ज्या व्यक्ती आर्थिक अडचणीत आहेत किंवा ज्यांचा सरकारी धोरणांना विरोध आहे, अशा ‘सॉफ्ट टार्गेट्स’ना आयएसआय मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढत आहे.
In view of what has happened in delhi blast it is becoming very clear ISI will train home grown terror amongst disgruntled youth to target India .I have reports from credible source to suggest the presence of Pakistani Generals and brigadiers in Chittagong and Dhaka . ISI is 1/2 pic.twitter.com/hV2cQLRbeZ — Pradyot_Tripura (@PradyotManikya) November 11, 2025
credit : social media and Twitter
पाकिस्तानची नजर आता केवळ काश्मीरवर नसून भारताच्या ईशान्येकडील राज्यांवरही आहे. बांगलादेशातील अस्थिरतेचा फायदा घेऊन तिथे ‘लाँच पॅड’ तयार करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतात हिंसाचार घडवण्यासाठी स्थानिक स्तरावर गट तयार केले जात आहेत. फरीदाबादमध्ये अलीकडेच पकडलेले ‘स्वदेशी दहशतवादी मॉड्यूल’ (Indigenous Terror Module) हे याच कटाचा एक भाग असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानला अशा प्रकारे हिंसाचार घडवायचा आहे जेणेकरून जागतिक स्तरावर ते हात झटकू शकतील आणि याला भारताचा ‘अंतर्गत प्रश्न’ म्हणून हिणवू शकतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर
पाकिस्तानच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताच्या गृह मंत्रालयाने कडक पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच ‘राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण’ जाहीर केले आहे. याअंतर्गत ‘राष्ट्रीय तपास संस्थे’ने (NIA) राज्यांमध्ये विशेष एटीएस (ATS) पथके तयार केली आहेत. सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांना या नव्या धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून आयएसआयचे हेरगिरीचे जाळे मुळापासून उखडून टाकता येईल.
Ans: आयएसआय स्थानिक लोकांना भडकवून, सरकारी धोरणांविरुद्ध हिंसक निदर्शने घडवून आणि भारतीय लष्कराची प्रतिमा मलिन करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: यामध्ये महिलांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाती उघडून लष्करी किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी जवळीक साधली जाते आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून गोपनीय माहिती चोरली जाते.
Ans: गृह मंत्रालयाने 'राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण' सुरू केले असून एनआयए (NIA) आणि राज्यांच्या एटीएस (ATS) पथकांना हाय अलर्टवर ठेवले आहे.






