Will Ukraine be divided in two parts Shocking signal from Trump's envoy
कीव: गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच युरोपियन युनियन आणि नाटो देश देखील यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी अनेक वेळा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे. दोन्ही देशांनी 30 दिवसांच्या युद्धविरामाला सहमती देखील दर्शवली होती. मात्र रशियाने हल्ला करत युक्रेनला धक्का दिला.
दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कीवमधील ट्रम्प यांच्या प्रतिनिधीने रशियाने युद्धबंदी स्वीकारण्यास उशिर केला तर युक्रेनचे बर्लिनसारखे दोन तुकडे होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची चिंता वाढली आहे.
कीवमधील ट्रम्प यांच्या दूताने म्हणजेच जनरल कीथ केलॉग यांनी म्हटले आहे की, युक्रेनला स्वतंत्र्य नियंत्रण क्षेत्रांत विभागले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमध्ये पश्चिम भागात ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याचे आश्वासन दल तैनात केले जाणार आहे. यामुळे रशिया पूर्व भागांत आपले सैन्य कायम ठेवेल. दोन्ही देशांमध्ये एककीडे सेना आणि एकीकडे निशस्त्र भाग असमार आहे. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिका कोणा एका देशाच्या बाजून नसून कोणतेही सैन्य पाठवणार नाही.
कीथ केलॉग यांनी या परिस्थितीची तुलना बर्लिनमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या परिस्थिती केली आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशिया, फ्रान्स आणि ब्रिटनचे नियंत्रण होते. दरम्यान लीग यांच्या या वक्तव्यावर युक्रेनकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान दुसरीकडे अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “रशियाने आता युद्धबंदीसाठी पाऊल उचलले पाहिजे, युद्धामुळे दर आठवड्याला हजारो लोकांचा बळी जात आहे. हे भयानत आणि अनावश्यक युद्ध आहे. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे युद्ध सुरुच झाले नसते.”
आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम होणार का? की युद्धामुळे यूक्रेन दोन भागात विभागला जाणार. सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. रशिया-यूक्रेन युद्धामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.