Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येमेनमधील संघर्षाला नवे वळण; काय असेल इस्त्रायलची नवीन रणनिती? पुढचे युद्धभूमीचे ठिकाण?

इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्याचे गाझा आणि लेबनॉनमध्ये हमास व हिजबुल्लाह  या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. तसेच सीरिया आणि येमेनच्या बंडखोरांविरोधातही युद्ध सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 26, 2024 | 07:20 PM
येमेनमधील संघर्षाला नवे वळण; काय असेल इस्त्रायलची नवीन रणनिती? पुढचे युद्धभूमीचे ठिकाण?

येमेनमधील संघर्षाला नवे वळण; काय असेल इस्त्रायलची नवीन रणनिती? पुढचे युद्धभूमीचे ठिकाण?

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्याचे एकीकडे गाझा आणि लेबनॉनमध्ये हमास व हिजबुल्लाह  या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. तिसऱ्या बाजूल इस्त्रायल सीरियामध्ये बंडखोरांविरोधात मोठी भूमिका बजावत आहे. दरम्यान इस्त्रायलने येमेनमधील हुथी बंडखोरांवरही हल्ले केले आहेत. इस्त्रायल इराण समर्थित हूथी गटाला लक्ष्य करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि हूथींमध्ये संघर्ष सुरू आहे.

इस्रायलने हूथी नियंत्रित भागांवर तीव्र हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी हूथींविरोधात ठोस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. डिसेंबरच्या मध्यापासून इस्रायलने यमनमधील हूथी पायाभूत सुविधांवर पाच हवाई हल्ले केले. हे हल्ले हूथींनी इस्रायलवर केलेल्या 200 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र आणि 170 ड्रोन हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल होते. रेड सीमध्येही हूथी गट सक्रिय आहे, ज्यामुळे इस्रायलला जागतिक जलवाहतुकीच्या मार्गांवर धोक्याची भावना आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबान सरकारने पाकिस्तानी राजदूताला खडसावले म्हणाले…

इराणशी असलेले संबंध आणि आव्हाने

हूथी गट इराणच्या पाठिंब्यावर उभा असून, इस्रायल विरोधातील प्रतिरोधचा भाग बनला आहे. हमास व हिजबुल्लाह सध्या शांत राहिल्यामुळे इस्रायलसाठी हूथी हा महत्त्वाचा विरोधक बनला आहे. मात्र, येमेनमधील डोंगराळ भूप्रदेशामुळे हूथी गटाच्या मजबूत अड्ड्यांवर हल्ला करणे इस्रायलसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे.

हूथींना इराणकडून पाठिंबा असूनही, त्यांचा कार्यभार अधिक स्वतंत्र आहे, यामुळे इराणच्या दबावाचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. हूथी गटांमध्ये हवाई हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करून प्रतिकार टिकवून ठेवला आहे. त्यामुळे इस्रायलला त्यांच्या हालचाली रोखण्यासाठी केवळ हवाई हल्ले पुरेसे ठरणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने हूथींविरोधात हवाई हल्ले सुरू ठेवले तरी व्यापक रणनीतीसाठी अमेरिकेसारख्या मित्र राष्ट्रांशी आणि अरब देशांशी सहकार्य गरजेचे ठरेल. लष्करी कारवाया व कूटनीतिक प्रयत्न यांचा योग्य समतोल साधूनच हूथी गटाची ताकद कमी करता येईल.

येमेनमधील संघर्ष आता पश्चिम आशियातील नवीन रणांगण ठरू शकते. इराणच्या पाठिंब्याने सशक्त झालेला हूथी गट, त्यांची भूगोलावर आधारित लढाऊ क्षमता, आणि इस्रायलसाठी निर्माण झालेला धोका यामुळे हा संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता कमी आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीना प्रत्यार्पण प्रकरणी नवीन वाद; बांगलादेश भारताला पाठवणार ‘रिमाइंडर लेटर’

Web Title: Will yemen is next battlefield for israel after hamas and gaza what will be israels new strategy nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • Hamas
  • Hezbollah
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
1

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
2

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?
3

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
4

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.