
Hamza bin Laden video 2026 Al Qaeda 9/11 25th anniversary video
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. न्यू यॉर्कमधील ट्विन टॉवर्स, पेंटागॉन आणि पेनसिल्व्हेनिया येथे झालेल्या या हल्ल्यांमध्ये २,९७७ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला होता. या काळ्या दिवसाची २५ वी वर्षपूर्ती साजरी होत असतानाच, दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’च्या (Al Qaeda) अधिकृत माध्यम शाखेने (अस-सहाब) एक ५० मिनिटांचा विशेष व्हिडिओ जारी केला आहे. “११ सप्टेंबरच्या हल्ल्यांची पंचवीस वर्षे” या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये ओसामा बिन लादेनचा मुलगा आणि संभाव्य उत्तराधिकारी मानला जाणारा हमजा बिन लादेन (Hamza Bin Laden) प्रत्यक्ष दिसल्याने आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
हमजा बिन लादेन हा अल-कायदामध्ये ओसामा बिन लादेनचा नैसर्गिक वारसदार म्हणून उभा राहत होता. परंतु, २०१९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एका विशेष दहशतवादविरोधी कारवाईत अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर हमजा मारला गेल्याचा दावा केला होता. अमेरिकेने त्याच्यावर १० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. मात्र, अल-कायदाने कधीही अधिकृतपणे त्याच्या मृत्यूचा स्वीकार केला नव्हता किंवा त्याच्यासाठी पारंपरिक शोकसंदेशही जारी केला नव्हता. आता ७ वर्षांनंतर आलेल्या या ताज्या व्हिडिओमुळे हमजा खरोखरच मारला गेला होता की तो जिवंत आहे, यावरून नव्याने वाद आणि संशय निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
या नव्या ५० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हमजा बिन लादेन पारंपरिक पांढरी पगडी घालून एका तुटलेल्या मातीच्या भिंतीला टेकून बसलेला दिसतो, तर त्याच्या शेजारी एक असॉल्ट रायफल ठेवलेली आहे. हा त्याच्या प्रत्यक्ष वावराचा पहिलाच असा फुटेज मानला जात आहे. या व्हिडिओमध्ये अल-कायदाचा माजी प्रमुख आयमान अल-जवाहिरीचे पूर्वी कधीही न पाहिलेले फोटोही दाखवण्यात आले आहेत. गुप्तचर विश्लेषकांच्या मते, अल-कायदाचा सध्याचा प्रमुख सैफ अल-अदल याच्या वैचारिक सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी आणि तरुण दहशतवाद्यांची नवीन भरती करण्यासाठी ‘बिन लादेन’ या नावाचा व कौटुंबिक प्रतिमेचा पुन्हा एकदा वापर केला जात आहे.
1/ 🧵 Al-Qaeda’s As-Sahab released a 25th anniversary video, “A Quarter Century of the 11 September Raids (Part One).” It features footage of a man it presents as Hamza bin Laden. He appears 3 times, & how al-Qaeda frames him matters as much as what he says pic.twitter.com/VOmMn7a7MY — Sara Harmouch, Ph.D. د.سارة هرموش (@Dr_SaraHarmouch) September 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
या व्हिडिओची सुरुवात सप्टेंबर २०१४ मध्ये अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंटने (AQIS) कराची नौदल तळावर केलेल्या हल्ल्याच्या फुटेजने होते. यावरून अल-कायदाच्या मध्यवर्ती नेतृत्वावर पाकिस्तानी दहशतवादी गटांचा असलेला प्रभाव अधोरेखित होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ९/११ च्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेत सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असतानाच हा प्रोपोगंडा व्हिडिओ समोर आल्याने अमेरिकन गुप्तचर संस्था (CIA) आणि पेंटागॉन या व्हिडिओची सखोल तांत्रिक पडताळणी करत आहेत. हा व्हिडिओ जुना आहे की अलीकडचा, याचा तपास सध्या सुरू आहे.