
Yemen on the brink of division Southern faction STC issues its constitution Saudi Arabia begins bombing
Yemen Partition News : दशकभरापासून गृहयुद्धाच्या आगीत होरपळणारा येमेन आता कायमचा दोन तुकड्यांत विभागला जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण येमेनमधील (Yemen) शक्तिशाली फुटीरतावादी गट सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STC) ने एक ऐतिहासिक आणि तितकाच वादग्रस्त निर्णय घेत स्वतंत्र ‘संविधान’ जारी केले आहे. या निर्णयामुळे सौदी अरेबियाचा पारा चढला असून, त्यांनी दक्षिण येमेनमधील फुटीरतावाद्यांच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले (Air Strikes) सुरू केले आहेत. यामुळे येमेनमध्ये आता केवळ अंतर्गत बंडखोरी राहिली नसून, सौदी आणि युएई मधील ‘प्रॉक्सी वॉर’ उघडपणे समोर आले आहे.
एसटीसीचे प्रमुख ऐदारौस अल-जुबैदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ही घोषणा केली. “दक्षिण अरब राष्ट्रासाठी आमचे नवीन संविधान तयार आहे. पुढील दोन वर्षे हे संविधान लागू राहील आणि त्यानंतर आम्ही अधिकृतपणे जनमत चाचणी (Referendum) घेऊ,” असे जुबैदी यांनी स्पष्ट केले. दक्षिण येमेनच्या जनतेला स्वतंत्र देश हवा आहे की नाही, याचा निर्णय ते स्वतः घेतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे, जर हा प्रस्ताव मान्य झाला नाही, तर आम्ही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढू, असा लष्करी इशाराही त्यांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
स्वतंत्र संविधानाची घोषणा होताच सौदी अरेबियाने याला ‘बंडखोरी’ ठरवले आहे. सौदी समर्थित येमेनी लष्कराने हदरमौत प्रांतात मोठी आघाडी उघडली आहे. सौदीच्या लढाऊ विमानांनी एसटीसीच्या तळांवर रात्रभर बॉम्बफेक केली. सौदीचा असा दावा आहे की, एसटीसी शांतता चर्चेत अडथळा आणत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या लष्करी कारवाईमुळे हदरमौत आणि एडेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हजारो नागरिक स्थलांतर करत आहेत.
Major Breaking News ‼️ Thousands rally in Seiyun, Hadhramaut Governorate, calling on Southern Transitional Council to declare independent “South Arabia” state Following the STC’s rapid offensive this month—targeting forces linked to Yemen’s Muslim Brotherhood-affiliated Islah… pic.twitter.com/sIZFVjsaRC — Habtish Gurmu (Commentary) (@Habtishgreat) December 29, 2025
credit : social media and Twitter
येमेनच्या या संकटामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या आखाती देशांमधील दरी रुंदावली आहे. सौदी अरेबियाला एकसंध येमेन हवा आहे, जेणेकरून तिथल्या सीमा सुरक्षित राहतील. मात्र, युएई समर्थित एसटीसीला दक्षिणेत आपले स्वतंत्र अस्तित्व हवे आहे. गेल्या काही दिवसांत सौदीच्या शिष्टमंडळाला एडेनमध्ये उतरण्यापासून रोखण्यात आले होते, ज्याचा बदला आता सौदी लष्करी कारवाईतून घेत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’
१९६७ ते १९९० या काळात दक्षिण येमेन हा एक स्वतंत्र देश होता. १९९० मध्ये उत्तर आणि दक्षिण येमेनचे विलीनीकरण झाले, परंतु हे विलीनीकरण कधीही यशस्वी होऊ शकले नाही. आता ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा तोच इतिहास डोके वर काढत आहे. जर येमेनची फाळणी झाली, तर त्याचा परिणाम जागतिक तेल व्यापार आणि लाल समुद्रातील (Red Sea) सुरक्षेवर होणार आहे.
Ans: एसटीसीने दक्षिण येमेनसाठी स्वतंत्र संविधान जारी केले असून पुढील दोन वर्षांत स्वतंत्र राष्ट्रासाठी जनमत चाचणी घेण्याची घोषणा केली आहे.
Ans: सौदी अरेबियाला येमेनची एकता टिकवायची आहे. एसटीसीचा स्वतंत्र देशाचा प्रयत्न सौदीला बंडखोरी वाटत असल्याने त्यांनी हवाई हल्ले केले आहेत.
Ans: होय, १९६७ ते १९९० या काळात दक्षिण येमेन हा एक स्वतंत्र देश होता. १९९० मध्ये त्याचे उत्तर येमेनशी विलीनीकरण झाले होते.