येमेनमध्ये युएईला मोठा धक्का, सौदी समर्थित गव्हर्नरकडून एसटीसीविरुद्ध कारवाईची घोषणा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
एडेन/रियाध: आखाती देशांमधील दोन सर्वात मोठे मित्र मानले जाणारे सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आता येमेनच्या भूमीवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येमेनच्या तेलसमृद्ध हद्रामौत (Hadramaut) प्रांतात सौदी समर्थित सरकारने युएईच्या ‘प्रॉक्सी’ सैन्याविरुद्ध (STC) मोठी लष्करी मोहीम जाहीर केली आहे. १ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या घडामोडींमुळे दक्षिण येमेनचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून, युएईने आपले उर्वरित सैन्य येमेनमधून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हद्रामौतचे नवनियुक्त गव्हर्नर सलेम अहमद सईद अल-खुनबाशी यांनी घोषणा केली की, युएई समर्थित ‘सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल’ (STC) च्या ताब्यात असलेले लष्करी तळ आता स्थानिक प्रशासन आणि सौदी समर्थित ‘होमलँड शील्ड फोर्सेस’कडे सुपूर्द करावे लागतील. “हे युद्धाचे निमंत्रण नाही, तर सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेले पाऊल आहे,” असे सांगत त्यांनी एसटीसीला शांततेने माघार घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एसटीसीने याला थेट आव्हान मानले असून सीमेजवळ सैन्य तैनात केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
या वादाचा सर्वात मोठा फटका एडेन आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. सौदीचे राजदूत मोहम्मद अल-जाबेर यांनी आरोप केला आहे की, एसटीसी प्रमुखांनी सौदीचे विमान एडेनमध्ये उतरू दिले नाही. प्रत्युत्तरादाखल सौदी अरेबियाने एडेनवर हवाई नाकेबंदी (Air Blockade) लादली आहे. एसटीसीने असा दावा केला आहे की सौदी अरेबिया येमेनच्या सार्वभौमत्वाचा वापर करून दक्षिण येमेनला दबावाखाली ठेवत आहे.
🇸🇦🇦🇪🇾🇪🔥 Saudi Arabia is on high alert‼️ UAE-backed STC rejects Saudi Arabia’s ultimatums to withdraw forces from 70% illegal occupied Yemeni Areas. ‼️⚠️ Saudi Arabia deployed Eurofighter Typhoon, F-15e and Panavia Tornado to bomb STC in coming hours. pic.twitter.com/l7RMfgSbMC — RKM (@rkmtimes) December 31, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Conflict : 10 मिनिटांची भेट अन् सौदीची नाराजी! क्राऊन प्रिन्स पाकिस्तानवर भडकले; सौदी-युएई संघर्षात पाकची कोंडी
डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सौदी अरेबियाने युएईला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर युएईने आपले सर्व लष्करी कर्मचारी येमेनमधून काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. युएई उघडपणे एसटीसीला स्वतंत्र दक्षिण येमेनसाठी पाठिंबा देते, तर सौदी अरेबियाला येमेनची अखंडता कायम ठेवून तिथे आपले वर्चस्व हवे आहे. हद्रामौत आणि माहरा या प्रांतांवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही देशांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.
Ans: STC (Southern Transitional Council) हा दक्षिण येमेनमधील फुटीरतावादी गट असून त्यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) चा लष्करी आणि आर्थिक पाठिंबा आहे.
Ans: हद्रामौतचे गव्हर्नर सलेम अहमद सईद अल-खुनबाशी आहेत. त्यांनी एसटीसीकडून लष्करी तळ परत घेण्यासाठी ऑपरेशन जाहीर केले आहे.
Ans: सौदी अरेबियाला येमेनमध्ये एकसंध सरकार हवे आहे, तर युएई दक्षिण येमेनच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देत आहे, ज्यामुळे वर्चस्वाच्या लढाईतून हा तणाव वाढला आहे.






