Trump Threatens Iran: "आता काही झालं तर अमेरिका हल्ला करेल!" इराणमध्ये ७ निदर्शकांचा मृत्यू; संतप्त डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump on Iran Protest : मध्य पूर्वेतील तणाव आता एका स्फोटक वळणावर पोहोचला आहे. इराणमध्ये महागाई आणि चलनाचे मूल्य कोसळल्याने सर्वसामान्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अतोनात हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ७ निदर्शकांचा बळी गेल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी इराणच्या (Iran) राज्यकर्त्यांना कडक शब्दात बजावले आहे की, जर शांततापूर्ण आंदोलकांचे रक्त सांडणे थांबले नाही, तर अमेरिका लष्करी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत इराणला धारेवर धरले. “इराणमधील लोक स्वातंत्र्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना मारणे बंद करा. अमेरिका पूर्णपणे तयार आहे (Fully Prepared) आणि आम्ही कडक कारवाई करण्यास सज्ज आहोत,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विधानामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धाची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे. विशेषतः जून २०२५ मध्ये अमेरिकेने इराणच्या काही तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर हा तणाव आता टोकाला पोहोचला आहे.
इराणमधील हे आंदोलन रविवारी (२८ डिसेंबर २०२५) तेहरानच्या ‘ग्रँड बाजार’मधील व्यापाऱ्यांनी सुरू केले होते. इराणचे चलन ‘रियाल’ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १४ लाखांच्याही खाली कोसळले आहे. महागाईचा दर ४२.५ टक्क्यांवर गेल्याने सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य खरेदी करणेही कठीण झाले आहे. तेहरान, इस्फहान आणि लोरेस्तान सारख्या प्रांतात हजारो लोक “हुकूमशहा मुर्दाबाद”च्या घोषणा देत रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी १० हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात उडी घेतल्याने परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
‘सीएनएन’ आणि मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, लोरेस्तान आणि चहारमहाल प्रांतात सुरक्षा दलांनी आंदोलकांवर थेट गोळीबार केला. यात एका निष्पाप मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी पोलीस वाहने पेटवून दिली, तर काही ठिकाणी निमलष्करी दलाच्या (Basij) जवानांवरही हल्ले झाले. सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली, तरी लोक माघार घेण्यास तयार नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
एकीकडे सुरक्षा दले दडपशाही करत असताना, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. त्यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना मान्य केले की, जनतेच्या मागण्या रास्त आहेत. “इस्लामिक तत्त्वांनुसार, जर आपण लोकांच्या पोटाचा प्रश्न सोडवू शकलो नाही, तर आपल्याला नरकात जावे लागेल,” असे हताश विधान त्यांनी केले आहे. मात्र, इराणमधील खरी सत्ता सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हातात असल्याने पेझेश्कियान यांच्या बोलण्याला किती किंमत मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ans: इराणमध्ये वाढलेली प्रचंड महागाई (४२.५%), चलनाचे अवमूल्यन आणि बिघडलेली आर्थिक परिस्थिती यामुळे जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे.
Ans: ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले आहे की, जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांना मारणे सुरूच ठेवले, तर अमेरिका लष्करी कारवाई करण्यास पूर्णपणे तयार आहे.
Ans: इराणच्या चलनाचा (Rial) दर डॉलरच्या तुलनेत कमालीचा घसरला असून महागाई गेल्या अनेक वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे.






