Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहे. ट्रम्प यांच्या शांतता योजनेला परवानगी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 02, 2025 | 10:57 AM
Volodymir Zelensky and Emmanuel Macron

Volodymir Zelensky and Emmanuel Macron

Follow Us
Close
Follow Us:
  • Russia Ukraine युद्ध थांबणार
  • झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट
  • युक्रेनच्या सुरक्षा हमीसाठी केली चर्चा
Volodymir Zelensky and Emmanuel Macron Meeting : पॅरिस : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukriane War) जवळपास गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक राजकीय प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावरुन युक्रेन रशिया युद्ध लवकरच थांबेल अशा आशा निर्माण झाली आहे.

VIDEO: एका रात्रीत 476 हल्ले! ड्रोन–मिसाईल महाआक्रमणामुळे टेर्नोपिल हादरले; 25 जण ठार, 19 जण जिवंत जाळले

नुकतेच झेलेन्स्की यांनी फ्लोरिडा येथे अमेरिका आणि युक्रेनिय अधिकाऱ्यांसोबत युद्धबंदीसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत अमेरिकेने मांडलेल्या शांतता प्रस्तावर आणि त्यातील सुधारणांवर चर्चा करण्यात आली. ही योजना अमेरिका आणि रशियामध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु यामध्ये पूर्णत:रशियाच्या हिताच्या अटी होत्या. याला युरोपियन राष्ट्रांनी विरोध केला आहे. युरोपीयन राष्ट्रांच्या मते, अमेरिका रशियाला जास्त महत्त्व देत आहे. हे युक्रेनच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. युरोपियन राष्ट्रांनी केवळ अमेरिकेच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.

युक्रेनल  ठोस सुरक्षा हमी देण्यासाठी प्रयत्न

याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनला सुरक्षा पुरवण्यावर चर्चा झाली. मॅक्रॉन यांनी इतर मित्र युरोपियन राष्ट्रांना यु्क्रेनला ठोस सुरक्षा हमी देण्याचे आवाहन केलेआहे. जर रशियाच्या बाजूने पक्षपाती युद्धबंदी झाली तर याचा दोन्ही देशांमध्ये संतुलन राखण्यावर प्रभाव पडू शकतो. यामुळे अमेरिकेच्या शांतता योजना दोन्ही देशांच्या हिताची असावी. दोन्ही देशांनी जर्मनी, पोलंड, ब्रिटन, आणि नाटो सरचिटणीसांनी युरोपीय मित्र राष्ट्रांसोबत चर्चा करण्याचे आमंत्रण दिले आहे.

दरम्यान ट्रम्प यांच्या २८ कलमी योजनेला रशियाने मान्यता दिली आहे. यामध्ये युक्रेनला त्यांची सैन्य शक्ती कमी करावी लागणार आहे, तसेच युक्रेनच्या नाटो देशात सहभागही रोखण्यात येईल आणि युक्रेनचा काही प्रदेश रशियाला सोपवायचा अशा, तरतुंदाचा या योजनेत समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) अमेरिकेच्या सल्लागार स्टीव्ह वीटकॉफ यांची भेट घेणार आहे.

यामुळे युरोपीयन नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, अमेरिका आणि रशिया चर्चांमुळे युक्रेनसाठी अधिक धोका निर्माण होत आहे. यामुळे युक्रेनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मॅक्रॉन यांनी युरोपीय देशांना आवाहन केले आहे.

Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?

Web Title: Zelensky meets macron in paris for security guarantee as us push ukraine russia ceasefire plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट
1

Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयारण होणार, अमेरिकेचा जळफळाट

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप
2

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ
3

Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 
4

काय आहे Monroe Doctrine? ज्यामुळे संपूर्ण युरोप बनला अमेरिकेचा शत्रू; ट्रम्प यांना हेकेकोरपणा पडला महागात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.