file photo - social media
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन 7 महिने उलटले आहे. हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. मात्र, दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला आहे. शनिवारी इस्रायलने गाझामधील रफाह शहरावर हल्ले केले. यामुळे इस्रायलने लोकांना शहर रिकामे करण्याचा इशारा दिला आहे.
[read_also content=”लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आला अल्लू अर्जुन; चाहते आऊट ऑफ कंट्रोल, गुन्हा दाखल! https://www.navarashtra.com/movies/case-registered-against-actor-allu-arjun-due-to-traffic-problem-caused-by-crowd-of-fans-532389.html”]
रिपोर्ट नुसार, संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने गाझामधीलह श रफाहरातील रहिवाशांना शहर रिकामं करण्यास सांगितलं आहे. शनिवारी इस्त्रायली हल्ल्यांनी रफाहसह गाझाच्या काही भागांनाही फटका बसला. अशा परिस्थितीत राफा शहरातील रहिवाशांना घरे सोडावी लागत आहेत. युद्धबंदी नसल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. यासोबतच लष्कराने उत्तर गाझामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केल्याचा दावाही करण्यात आला आहे. दहशतवादी संघटना हमास येथे पुन्हा संघटित होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. इस्त्रायलने सांगितले की ते आता रफाह शहरातही हल्ले वाढविण्यास तयार आहेत.
मध्य गाझामधील हल्ल्यात एकूण 21 मृत्यू
इस्रायलमधील मध्य गाझा येथे झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांचे मृतदेह देर अल-बालाह शहरातील अल अक्सा शहीद रुग्णालयात नेण्यात आले. हेल्प लाईन सेंटरच्या परिसरात मृतदेह पांढऱ्या कपड्याने झाकलेले होते. या मृतदेहांम