Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गाझामध्ये शनिवारी (२३ ऑगस्ट) इस्रायलने तीव्र हवाई हल्ले केले आहे. यावेळी तंबूत राहणाऱ्या लोकांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये ३३ पॅलेस्टिनी लोकांचा बळी गेला आहे. सध्या संयुक्त राष्ट्राने इस्रायलच्या या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते, गाझा दुष्काळग्रस्त परिस्थितीत असताना इस्रायलच्या कारवायांमुळे अधिक नुकसान होत आहे. इस्रायल आंततरराष्ट्रीय कायद्यांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे.
गाझात इस्रायलच्या हमासविरोधी कारवाईमध्ये तीव्र हल्ले केले जात आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांत अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच शनिवारी (२३ ऑगस्ट) झालेल्या हल्ल्यात १७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
याच वेळी नेदरलॅंडचे परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांनी रजीनामा दिला आहे. इस्रायलच्या गाझातील कारवायांना रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
‘अमेरिकेला भारताची गरज’ ; डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वादावर निक्की हेलीच्या व्यक्तव्याची जगभरात चर्चा
याच वेळी इस्रायली सैनिकांनी लोकांना हल्ल्याचा इशारा आधीच देण्यात आला होता, असे म्हटले आहे. त्यांनी कोणावरही गोळीबार केला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. इस्रायलने गाझातील पॅलेस्टिनींना गाझा पट्टीसोडून जाण्यासही सांगितले आहे.
दरम्यान इस्रायलवरही हुथी बंडखोरांचा हल्ला सुरु आहे. हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अवीव शहरावर शनिवारी (२३ ऑगस्ट) पहाटे ड्रोन हल्ले केले होते. यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाला धोका निर्माण झाला होता. यामुळे विमानवाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. हुथी बंडखोरांनी गाझातील इस्रायलच्या कारवायांना विरोध करण्यासाठी हा हल्ला केला होता.
इस्रायल हमास तात्पुरती युद्धबंदी
दरम्या गेल्या आठवड्यात हमासने तात्पुरत्या युद्धबंदीसाठी मान्यता दिली आहे. गाझातील इस्रायलच्या वाढत्या कारवाया पाहता युद्धबंदीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
२४ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर हे युद्ध सुरु झाले होते. आज इस्रायल आणि हमासला (Israel Hamas War) दीड वर्षाहून अधिक काळ झाला आहे पण युद्ध थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
अहो आश्चर्यम! निर्दयी किम जोंग उन यांना पहिल्यांदाच फुटला अश्रूंचा बांध? नेमकं कारण काय? VIDEO






