• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Assembly Election 2022 »
  • Goa Assembly Election Exit Polls 2022 Nrsr

गोव्यातल्या बहुरंगी लढतीत कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल काय सांगतो बघा

गोव्यातील (Goa Assembly Election 2022) हायव्होल्टेज लढतीत कोणता पक्ष आणि उमेदवार बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यासंबंधी ‘द स्ट्रेलेमा’ पुणे या संस्थेचा एक्झिट पोल (Exit polls) समोर आला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 07, 2022 | 07:28 PM
exit polls
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assemble Election) यंदा अनेक ठिकाणी बहुरंगी लढत पाहायला मिळाली. यंदाची गोवा विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली. (Exit Polls 2022) अशावेळी गोव्यातील हायव्होल्टेज लढतीत कोणता पक्ष आणि उमेदवार बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. यासंबंधी ‘द स्ट्रेलेमा’ पुणे या संस्थेचा एक्झिट पोल (Exit polls) समोर आला आहे.

कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा विजय होण्याची शक्यता ?

पणजी – भाजप
कलंगुट – काँग्रेस
सालेगाव – काँग्रेस
सिओलीम – भाजप
म्हापसा – भाजप
थिवीम – टीएमसी
आल्डोना – काँग्रेस
मांद्रे – भाजप
मये – भाजप
बिचोलिम – एमजीपी

पर्रिकरांचं काय ?
पणजी विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ राहिलाय. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून बाबूश यांना संधी मिळाली. यंदा या मतदारसंघातून पर्रिकर यांचा मुलगा उत्पल यांनी उमेदवारी मागितली. पण भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंड पुकारत भाजपपुढे आव्हान निर्माण केलं. मात्र, बाबूश यांची पणजी पालिकेवर सत्ता असल्यामुळे आणि सोबतच बाजूच्या तालेगाव मतदारसंघात त्यांची पत्नी आमदार असल्यानं त्याचा लाभ बाबूश यांना झाल्याचं पाहायला मिळतं. या निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना सारस्वत मतदारांव्यतिरिक्त अन्य मतदारांवर प्रभाव टाकता आलेला नाही. तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार काँग्रेसला मतदान करताना दिसला. त्यामुळे पणजीत बाबूश यांचा विजय सुकर बनल्याचं ‘द स्ट्रेलेमा’चा एक्झिट पोल सांगतो.

[read_also content=”डोक्यावर छत नाही, शामियान्याखाली बसुन पोरांनी दिला बारावीचा पेपर! औरंगाबादच्या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी https://www.navarashtra.com/chhatrapati-sambhajinagar/marathwada/no-roof-over-head-12th-paper-demand-for-de-recognition-of-aurangabad-school-250928.html”]

कलंगुट मतदारसंघ
मायकल लोबो हे भाजपच्या पारंपरिक कॅथलिक मतदारसंघासाठीचा सर्वात प्रभावी चेहरा होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कलंगुट मतदारसंघात लोबो यांना रोखू शकेल अशी रणनीती आखण्यास भाजपला अपयश आल्याचं दिसून आलं. त्यामुळे हा मतदारसंघ लोबो एकहाती जिंकतील असा अंदाज आहे.

सालेगाव
सालेगावमध्ये भाजपने गोवा फॉरवर्ड पक्षातून आलेल्या विद्यमान आमदार जयेश साळगावकर यांना मैदानात उतरवलं होतं. तर लोबो समर्थक केदार नाईक यांना काँग्रेसकडून तिकीट मिळालं. अशावेळी विद्यमान आमदार साळगावकर यांच्याबाबत मोठी अँटी इन्क्मबन्सी पाहायला मिळाली. तसंच साळगावकर हे पाच वर्षातील कोणतही ठोस काम दाखवण्यात कमी पडले. सोबतच कॅथलिक मतदारांवर लोबोंचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे सालेगावातील मतदारांचा कल हा केदार नाईक यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळत असल्याचा अंदाज आहे.

सिओलीम
सिओलीमध्ये भाजपनं दयानंद मांद्रेकर यांना मैदानात उतरलं. तर काँग्रेसने मायकल लोबो यांच्या पत्नी डलायला लोबो यांना तिकीट दिलं. विद्यमान आमदार विनोद पालेकर अपक्ष तर कॅथलिक मतांवर प्रभाव असलेले पॅट्रिक आल्मेडा हे देखील अपक्ष रिंगणात उतरले होते. यात चार वेळा आमदार राहिलेले दयानंतर मांद्रेकर यांनी भंडारी समूह स्वत:कडे वळवण्यात यश मिळल्याचं दिसतं. तर कॅथलिक मतदार आणि लोबो कुटुंबियांचा आक्रमक प्रचार यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली. या मतदारसंघात मतदारांचा कल हा भाजपकडे ४२ टक्के, काँग्रेसकडे ४० टक्के, आल्मेडा यांच्याकडे १० टक्के तर इतरांकडे ८ टक्के राहील असा अंदाज आहे.

म्हापसा
कलंगुटला लागून असलेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जोशुआ डिसूजा यांचा विजय झाला होता. या मतदारसंघात त्यांच्या वडिलांनी अर्थात फ्रान्सिस डिसूजा यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, मागील काही वर्षात सुधीर कांदोळकर यांच्या माध्यमातून कडवं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र, वडिलांची प्रतिमा आणि भंडारी समुहाला सोबत ठेवण्यात जोशुआ डिसूजा यांनी यश आल्याचं दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदारांचा कल हा भाजपकडे ४६ टक्के, काँग्रेसकडे ४० टक्के तर इतरांकडे १४ टक्के राहिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

थिवीम
थिवीम मतदारसंघात भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या विद्यमान आमदार निळकंठ हळणकर यांना उमेदवारी दिली. तर विरोधातील कविता कांडोळकर याच मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला होता. काही वर्षातील अँटी इन्क्मबन्सी, जनसंपर्काचा अभाव आणि मतदारसंघातील निष्क्रियता यामुळे ही निवडणूक कविता कांदोळकर यांच्याकडे झुकताना पाहायला मिळतेय.

आल्डोना
आल्डोना मतदारसंघात काँग्रेसनं कॅथलिक समाजाचे कार्लोस अलवारीस यांना उमेदवारी दिली. गोव्यातील नामांकित वकील आणि महाधिवक्ता राहिलेल्या कार्लोस यांची प्रतिमा जनसामान्याममध्ये चांगली दिसून येत होती. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर टीएमसीकडून किरण कांदोळकर यांच्याकडून तगडं आव्हान उभं होतं. सुरुवातीला सोपी दिसणारी निवडणूक भाजपसाठी अवघड बनली. यात किरण कांदोळकर यांच्या माध्यमातून भाजपच्या भंडारी मतांमध्ये विभाजन दिसलं. तर कॅथलिक समूह मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबतच राहिला. त्यामुळे तिरंगी लढत झालेल्या या मतदारसंघात काँग्रेस विजयी होईल असा अंदाज आहे.

मांद्रे
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भाजपनं उमेदवारी नाकारत दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली. त्यात पार्सेकरांची बंडखोरी आणि एमजीपीच्या जीत आरोडकर यांचं तगडं आव्हान यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची बनली होती. सुरुवातीला भाजपसाठी अडचणीचा बनलेला हा मतदारसंघ पार्सेकर आणि अरोडकर यांच्यातील मतविभाजनामुळे भाजपच्या दयानंतर सोपटे यांच्याकडे झुकल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.

Web Title: Goa assembly election exit polls 2022 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 07:23 PM

Topics:  

  • Assembly Election
  • Exit Polls
  • Goa

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News : जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात…: ‘थर्माकोल मॅन’ रामदास माने यांचे प्रतिपादन

Satara News : जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात…: ‘थर्माकोल मॅन’ रामदास माने यांचे प्रतिपादन

Mar 03, 2026 | 12:12 PM
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर

Mar 03, 2026 | 12:10 PM
जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

Mar 03, 2026 | 12:03 PM
T20 World Cup 2026 Final साठी केली भविष्यवाणी! दक्षिण आफ्रिका फेव्हरिट पण टीम इंडिया…

T20 World Cup 2026 Final साठी केली भविष्यवाणी! दक्षिण आफ्रिका फेव्हरिट पण टीम इंडिया…

Mar 03, 2026 | 11:49 AM
तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

Mar 03, 2026 | 11:46 AM
Todays Gold-Silver Price: चांदीने गाठला नवीन उच्चांक! गेल्या 24 तासांत 20 हजार रुपयांनी वाढले दर

Todays Gold-Silver Price: चांदीने गाठला नवीन उच्चांक! गेल्या 24 तासांत 20 हजार रुपयांनी वाढले दर

Mar 03, 2026 | 11:44 AM
Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

Mar 03, 2026 | 11:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.