लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यात (Second Phase Voting In Uttar Pradesh) ९ जिल्ह्यांतील ५५ मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत ३९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान बुरख्यात मतदानासाठी ( Bogus Voting Wearing Burkha) आलेल्या महिलांच्या ओळखपत्रांशिवाय (Voting Without Identity Proof), मते टाकण्यात येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे बोगस मतदान मोठ्या प्रमाणात होत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. या महिलांची ओळख महिला पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
[read_also content=”हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरु – घटनेच्या अनुच्छेद २५ नुसार बंदी बेकायदेशीर, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद https://www.navarashtra.com/latest-news/hearing-of-hijab-controversy-case-is-going-on-in-karnataka-high-court-nrsr-238233.html”]
तर मुरादाबादमध्ये सपा आणि बसपा कार्यकर्त्यांत राडा झाला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्य़ांत हाणामारीचे आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहारनपूरमध्ये सपा आणि भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारीची घटना घडली आहे. अमरोहात सपाच्या उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप केला आहे.