फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी सीझन ६, दररोज नव्या वळणावर वळण घेत आहे. आजचे मित्र उद्या शत्रू बनत आहेत तर कालचे शत्रू आज मित्र आहेत. या वादात, नव्या राड्याने जन्म घेतला आहे. कारण आज भाऊचा धक्का आहे. भाऊचा धक्का म्हंटला तर गेम तर होणारच! रितेशने विशालची पोलखोल केली आहे. दीपाली आणि तन्वीबद्दल विशाल काय म्हणतो? त्याचे काय विचार आहेत? या गोष्टी रितेशने सगळ्यांसमोर आणले आहेत. त्यामुळे विशालची सगळ्यांदेखत नाचक्की झाल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात, बिग बॉसने प्रोमो शेअर केला आहे.
काय आहे त्या प्रोमोमध्ये?
प्रोमोमध्ये भाऊचा धक्का दिसत आहे. धक्क्यावर घरातले सर्व मंडळी बसली आहे. तितक्यात रितेश विशालला म्हणतो की “विशाल, स्पर्ध्येमध्ये आणि घृणा करण्यात फरक असतो. तुम्ही अनेकदा म्हणाला आहात की आय हेट तन्वी, आय हेट दीपाली!” पुढे रितेश विशालची पोलखोल करण्यासाठी एक फुटेज सादर करतो त्यामध्ये विशाल दिपालीबद्दल म्हणतो की “दीपाली फक्त दिसायला गोरी आहे. बाहेरच्या देशात सेल्सगर्ल दिपालीसारख्या दिसतात.”
ही गोष्ट जेव्हा दीपालीला कळते तेव्हा दिपालीचा पाझर फुटतो. डोळ्यातून आसवांच्या धारा पाहून विशाल रितेशला म्हणतो की दीपाली माझी चांगली मैत्रीण आहे. तेव्हा दीपाली रंगात येऊन म्हणते की “विशाल, मला तुझी चांगली मैत्रीण तर बोलूच नकोस.”
हा वाद पुढे काय रंग घेईल? दीपाली आणि विशाल यांच्यामध्ये असलेली मैत्री टिकेल की तुटेल? या सगळ्या गोष्टी पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे. आजच्या भाऊंच्या धक्क्यावर रितेश कुणाचा क्लास घेईल आणि कुणाचे करेल कौतुक? हेही पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे.
‘या’ प्रेक्षकांवर आहे टांगती तलवार
या आठवड्यात कारण सोनावणे, आयुष संजीव, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, सचिन कुमावत आणि राकेश बापटवर टांगती तलवार आहे त्यामुळे यामधून कोण होईल घराबाहेर आणि कोण राहील घरामध्ये? हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे.






