संग्रहित फोटो
याप्रकरणी मोहम्मद एहसान नजर (वय २०), अर्षद रोशन अली (वय २२), अखिलेश बिजूकुमार प्रसाद (वय २०), दिलीप सक्रु चव्हाण (वय ३६), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०), अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेले आरोपी बांधकाम मजूर आहेत. ते सध्या केसनंद भागातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहायला आहेत. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. तीन जणांची मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. उर्वरित तीन आरोपी वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
बोगस मतदानाचे गालबोट; नवयुवक मतदारांचा संताप
जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे ‘बोगस मतदानाची’. काही संवेदनशील केंद्रांवर धक्कादायक प्रकार समोर आले. अनेक नवयुवक मतदार, जे पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी उत्सुक होते, जेव्हा केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना मतदान अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा प्रकार उघडकीस येताच केंद्राबाहेर मोठा गोंधळ झाला. “आम्ही लोकशाहीचा उत्सव साजरा करायला आलो होतो, मात्र आमच्या हक्काचे मत कुणीतरी आधीच देऊन गेले, हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी संतापजनक प्रतिक्रिया एका युवती मतदाराने दिली. काही गावांमध्ये यामुळे दोन गटांत शाब्दिक चकमकीही उडाल्या, ज्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. एकीकडे मतदानाचा उत्साह असताना दुसरीकडे प्रशासकीय सावळागोंधळ आणि बोगस मतदानाच्या तक्रारींमुळे अनेक ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.






