फोटो सौजन्य: istock
सध्या हिवाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. या मोसमात अनेक जण माळशेज घाट, माथेरान, किंवा महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायचे प्लॅन बनवत असतात. अनेक जणांकडे आपली स्वतःची कार असल्यामुळे ते लॉंग ट्रिपचा प्लॅन बनवतात. पण जेव्हा आपण एखाद्या लॉंग ट्रिपवर जात असतो तेव्हा आपला प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्यासाठी अनेक उपयुक्त गॅजेट्स कारमध्ये असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया, कारमध्ये कोणते गॅजेट्स असणे महत्वाचे आहे.
प्रवासादरम्यान कारचा टायर पंक्चर झाल्यास चांगला प्रवास वाईट प्रवासात बदलू शकतो. अशा परिस्थितीत कारमध्ये पंक्चर किट ठेवल्यास त्याचा खूप उपयोग होतो. हे किट तुम्ही बाजारातून सहज खरेदी करू शकता. कार पंक्चर झाली तर तुम्ही स्वतः पंक्चर दुरुस्त करून सुरक्षित प्रवास करू शकता.
कार पंक्चर झाल्यानंतर पंक्चर किट वापरून तुम्ही ते दुरुस्त करू शकता. पण कारच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी टायर इन्फ्लेटरही लागतो. लॉंग ट्रीपमध्ये टायरमध्ये हवा कमी झाल्यास किंवा टायर पंक्चर झाल्यास ते कोणत्याही त्रासाशिवाय रिफिल करता येते.
अनेक कारमध्ये कंपनीज TPMS म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम सारखी फिचर देतात. पण तुमची कार जुनी असली तरी ती बाहेरूनही सहज बसवता येते. या फीचरमुळे, रस्त्यावर कार चालवताना सर्व टायरमधील हवेच्या दाबाची योग्य माहिती मिळते. यामुळे टायरमधील हवा सामान्यपेक्षा खूप कमी किंवा जास्त असल्यास अपघाताच्या वाढत्या धोक्याची आधीच माहिती मिळते.
हे देखील वाचा: भारतात बनणाऱ्या ‘या’ कार्स ठरताय विदेशात सुपरहिट, वाढत आहे मागणी
डॅश कॅमचा वापर कारमधील सेफ्टी वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. अनेक पर्यायांसह डॅश कॅम्स बाजारात उपलब्ध आहेत. हे कॅमेरे कारमध्ये सहज बसवता येऊ शकतात. तसेच हे समोर आणि कारच्या मागील बाजूस वापरले जाऊ शकतात. मार्केटमध्ये असे अनेक कॅमेरे आहे ज्याला आपण ॲपद्वारे ऑपरेट करू शकतो.
कारसाठी अनेक प्रकारच्या काच बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्ही रात्री खूप गाडी चालवत असाल तर कारमध्ये नाईट व्हिजन ग्लासेस लावा. असे केल्याने, तुम्हाला रात्री प्रवास करणे अधिक सोपे होईल आणि तुमची व्हिसिबिलीटी देखील सुधारेल.