फोटो सौजन्य; iStock
जगभरातील नावाजलेल्या ऑटो कंपनीज भारतात आपल्या कारचे उत्पादन वाढवत आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होत आहे. तसेच काही स्वदेशी कंपनीज सुद्धा आहेत ज्यांच्या कार्सची मागणी फक्त भारतातच नाही तर विदेशात सुद्धा आहे. सध्या भारतात अनेक ऑटो कंपनीजच्या कार्स बनत आहे. तसेच या कार्स विदेशात एक्स्पोर्ट सुद्धा होत आहे. चला जाणून घेऊया सप्टेंबर 2024 मध्ये एकूण किती कार आणि एसयूव्ही एक्स्पोर्ट करण्यात आले आहे. यासह, गेल्या महिन्यात कोणत्या टॉप-5 कार आणि SUV ला विदेशात सर्वाधिक मागणी होती, हे सुद्धा जाणून घेऊया.
अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये कार आणि SUV च्या एकूण 67379 युनिट्स अनेक देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत 60079 युनिट्स निर्यात झाले होते. आकडेवारीनुसार, निर्यातीत दरवर्षी 12 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.
हे देखील वाचा: 461 Km ची रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार झाली 32 हजार रुपयांनी महाग
निर्यातीच्या बाबतीत भारतातून 50 हून अधिक कार जगभरातील अनेक देशांमध्ये पाठवल्या जातात. मात्र यापैकी Nissan Sunny ला सर्वाधिक मागणी होती. विशेष बाब म्हणजे कंपनी ही सेडान कार भारतात विकत नाही पण तिचे उत्पादन भारतातच बनवते आणि जगातील अनेक देशांमध्ये ती निर्यात करते. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 5863 युनिट्सची निर्यात करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कारच्या 7361 युनिट्सची निर्यात झाली होती.
यानंतर, मारुतीने ऑफर केलेली क्रॉस ओव्हर एसयूव्ही फ्रॉन्क्स दुसऱ्या क्रमांकावर होती. या कारची एकूण 5200 युनिट्स निर्यात करण्यात आले. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ 1143 युनिट्सची निर्यात झाली होती.
मेड इन इंडिया कारच्या निर्यातीच्या बाबतीत, मारुती जिमनी गेल्या महिन्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. या एसयूव्हीच्या एकूण 4948 युनिट्सची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ 78 युनिट्स विदेशात पाठवण्यात आल्या होत्या.
टॉप-5 कार एक्सपोर्टच्या बाबतीत, पुढचा क्रमांक Hyundai Verna आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 4863 युनिट्सची निर्यात करण्यात आली होती. तर सप्टेंबर 2023 मध्ये 5482 युनिट्सची निर्यात झाली.
2023 मध्ये लाँच झालेल्या जपानी ऑटोमेकरच्या कॉम्पॅक्ट SUV Honda Elevate ला देखील टॉप-5 मध्ये स्थान मिळाले आहे. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या एकूण 4841 युनिट्स विदेहसत पाठवण्यात आल्या होत्या.