फोटो सौजन्य: Social Media
दिवाळी हा आपल्या सर्वांचाच आवडता सण, खासकरून नोकरदार व्यक्तींचा. याचे कारण म्हणजे दिवाळीत मिळणार बोनस. या शुभ काळात प्रत्येक नोकरदार व्यक्तीला ठराविक रक्कम बोनस म्हणून दिली जाते. याचसोबत आक्रसहित भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. पण चेन्नई स्थित असणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आधीच दिवाळी साजरा झाली आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांचे दमदार परफॉर्मन्स पाहता कंपनीने त्यांना 3.5 कोटीच्या कार आणि बाईक भेट म्हणून दिल्या आहेत. कंपनीच्या 30 उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इनोव्हा, एक्सेटर, क्रेटा, i20, मर्सिडीज बेंझ, ब्रेझा आणि एर्टिगा या गाड्या भेट देण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा: मुंबईत 10-15 लाख कमावणाराही गरीब, नोकरदारांच्या पगाराचे पैसे कोण खातंय… तरी कोण?
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, टीम डिटेलिंग सोल्युशन्स असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीचे मालक श्रीधर कन्नन आहेत. कन्नन यांनी त्यांनी कंपनीच्या काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना 28 कार आणि 29 स्कूटर भेट दिल्या आहेत. कंपनीसाठी नऊ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार तर सात वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रीधर यांनी एका खाजगी कार्यक्रमात दुचाकी भेट दिल्या. असे सांगितले जात आहे की श्रीधर कन्नन यांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या घरी आमंत्रित केले आणि नंतर त्यांना ही वाहने भेट दिली.
इंडिया टुडेसोबत बोलताना श्रीधर यांनी सांगितले की जेव्हा कंपनीची सुरुवात 2005 साली झाली होती तेव्हा फक्त 4 कर्मचारी आमच्यासोबत होते. आज हीच संख्या 180 वर पोहोचली आहे. त्यांनी पुढे सांगितले की आम्ही आतापर्यंत 30 कर्मचाऱ्यांना कार आणि 74 कर्मचाऱ्यांना दुचाकी गिफ्ट केल्या आहेत. कंपनीत काम करणारे सर्व लोक ग्रामीण पार्श्वभूमीतील आहेत. कामामुळे त्यांच्या जीवनात सुधार झाला आहे. आम्हाला त्यांना बाइक आणि कार देऊन त्यांचे जीवन अधिक सुधारायचे आहे. तो माझ्यासोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे. मला त्यांची काळजी घ्यायची होती. त्यांचा माझ्यावर आणि कंपनीवर विश्वास आहे.
यावेळी श्रेधार म्हणाले की कर्मचाऱ्यांना लग्नासाठी 50,000 रुपयांचे मॅरेज इन्सेन्टिव्ह सुद्धा दिले जाते. आता ही रक्कम एक लाख रुपयांपर्यंत नेली आहे.