
एथर एनर्जीने आपली नवीन फॅमिली स्कूटर एथर कोनार्क मार्केटमध्ये ऑफीशली लाँच केली आहे. ही नवीन स्कूटर कंपनीच्या नवीन EL प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असून, यात मेटल बॉडी आणि स्टील युनिबॉडी चेसिस देण्यात आली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे तर, यामध्ये ग्राहकांना एका चार्जमध्ये १०० किमी ते २०० किमीपर्यंतची रेंज मिळणारा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
व्हेरियंट्स आणि किंमती
एथरने ही नवीन स्कूटर कोनार्क एस आणि कोनार्क झेड या दोन मुख्य पर्यायांमध्ये आणली आहे.
बॅटरी आणि रेंज
या स्कूटरमध्ये विविध बॅटरी पॅकचे पर्याय दिले आहेत:
चार्जिंग क्षमता
प्रत्येक कोनार्क एस व्हेरियंटसोबत ४५० W चा ऑनबोर्ड चार्जर दिला जातो, ज्याद्वारे ती थेट वॉल सॉकेटवर चार्ज होऊ शकते. याशिवाय, अतिरिक्त चार्जिंगचा पर्याय वापरल्यास चार्जिंगचा वेग वाढून होम चार्जिंगचा वेळ अवघ्या २ ते ३ तासांपर्यंत खाली येतो. तसेच एथर ग्रिड च्या मदतीने अवघ्या १० मिनिटांत १३ ते १५ किमी पर्यंतची रेंज मिळू शकते.
सेफ्टी फीचर्स
एथर कोनार्क अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे:
या स्कूटरवर कंपनीकडून ३ वर्षे किंवा ३०,००० किमी ची Standard Vehicle Warranty दिली जात आहे. तसेच ती ५ वर्षे/६०,००० किमी पर्यंत वाढवता येऊ शकते, तर बॅटरीसाठी १० वर्षे/१,००,००० किमी पर्यंतचे वारंटी पॅकेज उपलब्ध आहे. ही स्कूटर क्वार्ट्ज व्हाईट, मॅजेस्टिक ग्रे, सेलेस्टियल गोल्ड आणि ल्युमेन कॉपर या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल.