फोटो सौजन्य: @khuleonwheels/ X.com
प्रत्यक्षात Audi SQ8 ला कंपनीच्या Q8 लाइन-अपमधील अधिक स्पोर्टी आणि परफॉर्मन्स-ओरिएंटेड मॉडेल म्हणून सादर केले जाणार आहे. ही SUV स्टँडर्ड Audi Q8 आणि टॉप-स्पेक Audi RS Q8 यांच्या मधल्या स्थानावर ठेवली जाईल. तिची अधिकृत किंमत लाँच इव्हेंटदरम्यान जाहीर केली जाणार असून हा कार्यक्रम दिल्ली येथे होणार आहे.
Hyundai Creta की Toyota Hyryder, 50 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणती कार बेस्ट?
नवी Audi SQ8 एक हाय-परफॉर्मन्स SUV म्हणून तयार करण्यात आली आहे. या SUV मध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 TFSI पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन सुमारे 500hp पॉवर आणि 770Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच Audi चे प्रसिद्ध quattro ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमही यात मिळते, ज्यामुळे चारही चाकांना प्रभावीपणे पॉवर मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार ही SUV केवळ 4.1 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. तर तिचा टॉप स्पीड 250 किमी/ताशी इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिक उत्तम ड्रायव्हिंग अनुभवासाठी यात अॅडॅप्टिव्ह एअर सस्पेन्शन आणि ऑल-व्हील स्टीयरिंगसारखी आधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत.
टर्बो हायब्रीड इंजिन, 1030 हॉर्सपॉवर अन् 10 कोटींची किंमत; भारतात Ferrari ची नवी सुपरकार सादर
Audi SQ8 चे डिझाइन स्टँडर्ड Q8 च्या तुलनेत अधिक आक्रमक, आकर्षक आणि स्पोर्टी ठेवण्यात आले आहे. यात मोठे एअर इंटेक्स, S-स्पेसिफिक बॅजिंग, मॅट सिल्व्हर एक्स्टेरियर एलिमेंट्स आणि क्वाड एग्झॉस्ट टिप्स देण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या आकाराचे अलॉय व्हील्स तिच्या लूकला अधिक दमदार बनवतात. कूपे-स्टाइल डिझाइनमुळे ही SUV एकाच वेळी प्रीमियम आणि स्पोर्टी अशी दुहेरी ओळख निर्माण करते.
Audi SQ8 चे केबिनही अत्यंत प्रीमियम आणि आधुनिक पद्धतीने डिझाइन केले गेले आहे. यात अलकांतारा आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा वापर करण्यात आला आहे. डॅशबोर्डवर दोन 12.3-इंच स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यापैकी एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी तर दुसरी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी वापरली जाते. याशिवाय या SUV मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल सीट्स, हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शनसारखे अनेक लक्झरी फीचर्सही देण्यात आले आहेत.






