फरीदाबादमध्ये भीषण स्फोट (फोटो- istockphoto)
हरियाणामधील फरीदाबाद कारखान्यात स्फोट
केमिकल ड्रममध्ये झाला भीषण स्फोट
अनेक कर्मचारी अन् पोलिस जखमी
फरीदाबाद: हरियाणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणामधील फरीदाबाद येथे एका कारखान्यात एक भीषण स्फोट झाला आहे. फरीदाबाद येथील सेक्टर 24 मध्ये कालका येथील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये तब्बल 35 जण जखमी झाले आहेत.
फरीदाबाद येथे एक केमिकल कंपनी आहे. त्या ठिकाणी मेटल शीट तयार करण्याचे काम केले जाते. त्या ठिकाणी भीषण स्फोट झाला. एका पाठोपाठ अनेक केमिकल ड्रम यांचा स्फोट झाला. आग थोड्याच वेळात परिसरात पसरली. आगीने एवढे भीषण स्वरूप धारण केले की, रस्त्यावर असणाऱ्या गाड्या देखील जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. या घटनेत अनेक कर्मचारी आगीच्या तडाख्यात सापडले. यामध्ये 5 पोलिस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत तब्बल 35 जण जखमी झाल्याचे समोर येत आहे.
जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे समोर आले आहे. आग लागल्याने कर्मचारी वाट दिसेल तिकडे पळू लागले.
केमिकल फॅक्टरीला भीषण आग
राजस्थानच्या औद्योगिक जिल्ह्यातील भिवाडी येथे आज (दि.16) सकाळी भीषण आग लागली. खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात अचानक आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की तेथील कामगारांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हृदयद्रावक अपघातात सात कामगार जिवंत जाळले गेले, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू
सोमवारी सकाळी ९:३० च्या सुमारास काम जोरात सुरू असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, भिवाडीच्या खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात सुमारे २५ कामगार उपस्थित होते. आग इतक्या अचानक आणि वेगाने पसरली की कामगारांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. एडीएम सुमिता मिश्रा यांनी सांगितले की, पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना ही घटना कळली आणि तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले.






