११ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (फोटो- सोशल मीडिया)
नवी दिल्ली : देशात हिवाळा आता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हवामान खात्याने 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. यामुळे थंडी परत येऊ शकते. मैदानी भागात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास, डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागात तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने 11 राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने ज्या राज्यांसाठी हा इशारा जारी केला आहे, त्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी आणि पौडी गढवालसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रतिकूल हवामान अपेक्षित आहे. हिमाचल प्रदेशात सध्या हवामान स्वच्छ राहील, परंतु १५ फेब्रुवारीनंतर उंचावर ढगाळ वातावरण आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील अंदाजे २९ जिल्ह्यांमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मथुरा, आग्रा, अलीगढ, अमेठी, बागपत, आझमगड, बहराइच, बलिया, बांदा, बाराबंकी, बरेली, बिजनौर, चंदौली, चित्रकूट, इटावा, फतेहपूर, गाझियाबाद, गाझीपूर आणि झाशी यांचा समावेश आहे.
हवामानात होतोय सातत्याने बदल
देशातील हवामानात सध्या बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयएमडीने याबाबत इशारा दिला आहे. हिंद महासागर आणि आणि बंगालच्या उपसागरात मध्यभागी हवेचा चक्रवर्ती प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे देशातील अनेक भागात हवामान बदलणार असल्याचे सांगितले गेले आहे.
जोरदार बर्फवृष्टीसह पाऊस
येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टि, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात देखील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 18 फेब्रुवारीला आणि उत्तराखंडमध्ये 18 आणि 19 तारखेला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.






