फोटो सौैजन्य: @ValKatayev(X.com)
काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने भारतातील मध्यम वर्गीय कुटुंबासाठी एक सोयीस्कर आणि स्वस्तात मस्त अशी कार लाँच केली होती. या कारचे नाव टाटा नॅनो. ही कार लाँच झाल्यानंतर काही जणांनी टाटा मोटर्सचे कौतुक केले होते, तर काही जणांनी या कारची खिल्ली उडवली होती. यांनतर कमी विक्रीमुळे कारचे प्रोडक्शन थांबवण्यात आले होते. पण आता टाटा नॅनोचे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये येणार अशी चर्चा रंगली आहे.
आज जरी टाटा नॅनोचे उत्पादन बंद झाले असले तरी, जुने नॅनो मॉडेल आजही रस्त्यावर धावताना दिसतात. आता अफवा वेगाने पसरत आहेत की टाटा मोटर्स त्यांची प्रसिद्ध नॅनो कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पुन्हा सादर करू शकते. जर असे झाले तर ग्राहकांकडून तिला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, कंपनीने अद्याप अधिकृतपणे या कारची कोणतीही लाँच डेट जाहीर केलेली नाही किंवा याची पुष्टी देखील केलेली नाही.
नवीन कार खरेदी करण्याअगोदर ‘या’ 5 टेस्ट महत्वाच्या, अन्यथा बसेल लाखो रुपयांचा फटका
टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते, जे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्लेला सपोर्ट करेल. यात 6-स्पीकर साउंड सिस्टम देखील असू शकते, जी ब्लूटूथ आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह येईल.
या कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात एबीएससह स्टीअरिंग, पॉवर विंडो आणि अँटी-रोल बार सारखी फीचर्स मिळू शकतात. याशिवाय, रिमोट फंक्शनॅलिटी आणि डेमो मोड देखील त्यात समाविष्ट असण्याची शक्यता आहे. मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देखील यात दिला जाऊ शकतो, जे या कारची रेंज आणि इतर महत्त्वाची माहिती देईल.
बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत, Tata Nano Electric एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 250 किमी अंतर कापेल अशी अपेक्षा आहे. अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही.
किंमतीबद्दल, असा अंदाज लावला जात आहे की टाटा नॅनो इलेक्ट्रिकची किंमत 5 ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. या बजेट-फ्रेंडली रेंजमुळे, ही कार परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
परंतु, टाटा मोटर्सने अद्याप टाटा नॅनो इलेक्ट्रिकच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर चालणाऱ्या अफवांवरून ही माहिती समोर आली आहे. पण जर टाटा नॅनो इलेक्ट्रिक लाँच झाली तर मग भारतीय इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये मोठा बदल दिसू शकतो.